हिंगोली रिसाला बाजार

हिंगोलीतील नवा मोंढा भागानंतर आता रिसाला बाजारातील 535 जणांना प्रशासनाने बजावली नोटीस

Hingoli Risala Bazaar: हिंगोलीतील रिसाला बाजारातील 535 मालमत्ताधारकांना प्रशासनाने मालकी हक्कावर नोटीस देऊन कायदेशीर पुरावे सादर करण्याचा आदेश दिला आहे.

हिंगोलीतील नवा मोंढा भागानंतर आता रिसाला बाजारातील 535 जणांना प्रशासनाने बजावली नोटीस

Hingoli Risala Bazaar


हिंगोली (Hingoli Risala Bazaar) : हिंगोली शहराच्या मध्यवर्ती भागातील रिसाला बाजार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील 535 मालमत्ताधारकांच्या मालकी हक्कावरच प्रशासनाने थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी या सर्व मालमत्ताधार कांना नोटीस बजावून आपल्या मालकीचे कायदेशीर पुरावे सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून रिसाला बाजार परिसरातील (Hingoli Risala Bazaar) जमिनींच्या मालकीबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. काही ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार झाल्याच्या तसेच अनधिकृत बांधकामे वाढल्याच्या तक्रारी होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नोटीस मिळाल्यानंतर परिसरातील मालमत्ताधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 7/12 उतारा, खरेदीखत, नगरपालिकेच्या कर पावत्या आणि एनए आदेश यांसारखी कागदपत्रे गोळा करण्यासाठी नागरिकांची उपविभागीय कार्यालयात एकच गर्दी होत आहे. 

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दिलेल्या मुदतीत पुरावे सादर न करणाऱ्या किंवा सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळणाऱ्या मालमत्तांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. या कारवाईमुळे अतिक्रमण आणि बेकायदेशीर व्यवहारांना आळा बसेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रिसाला बाजारातील या (Hingoli Risala Bazaar) कारवाईनंतर हिंगोली शहरातील इतर भागातील मालमत्ताधारकांचेही धाबे दणाणले आहेत.

संबंधित सामग्री

वसमत नगर पालिकेच्या दोन नगर सेवकांचे सदस्यत्व रद्द 

वसमत नगर पालिकेच्या दोन नगर सेवकांचे सदस्यत्व रद्द 

Vasmat Municipal Council: वसमत नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द, यामध्ये काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिज अब्दुल रहमान व राष्ट्रवादीचे शेख हबीब शेख बशीर

Aug 17, 2026
शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध; मोजणी प्रक्रिया पाडली बंद

शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध; मोजणी प्रक्रिया पाडली बंद

MLA Santosh Bangar: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेतकर्यांनी शक्तिपीठ महामार्गावरील कंपनी कर्मचारियोंच्या मोजणी प्रक्रियाला विरोध केला. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पथक

Aug 13, 2026
'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!

'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!

Latur Municipal Corporation: लातूर महानगरपालिकेत आयुक्तांनी काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी तात्काळ किंवा विहित वेळेत होतच नाही, उलट आयुक्तांचे आदेश धूळ खात पडलेले असतात. हे आदेश धूळ खात पडण्यासाठी

Aug 11, 2026
शेतकऱ्याचे अनुदान अपहार करणारे अधिकाऱ्यावर कारवाईचे मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

शेतकऱ्याचे अनुदान अपहार करणारे अधिकाऱ्यावर कारवाईचे मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

Farmers Thiya Andolan: कळमनुरी तालुक्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानातील अनुदान अपहार करण्याच्या आरोपावर कारवाईकरिता कडक मागणी करून आंदोलन केले.

Aug 10, 2026
रिसोडमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर प्रशासनाचा दणका!

रिसोडमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर प्रशासनाचा दणका!

रिसोड शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानपट्टी व किराणा दुकानांवर पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई केली.

Aug 08, 2026