हिंगोली जिल्हा परिषद

पाणीटंचाईच्या लढाईत ‘गैरहजेरी’ महागात: 3 ग्रामसेवक थेट निलंबित, 3 जणांची वेतनवाढ रोखली

Hingoli Zilla Parishad: हिंगोली जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या महत्त्वाच्या बैठकीत गैरहजर राहिलेल्या 3 ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी तत्काळ निलंबित

पाणीटंचाईच्या लढाईत ‘गैरहजेरी’ महागात: 3 ग्रामसेवक थेट निलंबित, 3 जणांची वेतनवाढ रोखली

Hingoli Zilla Parishad

हिंगोली (Hingoli Zilla Parishad) : जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न पेटलेला असताना प्रशासनाच्या बैठकीलाच दांडी मारणं तीन ग्रामसेवकांना चांगलंच भोवलं. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बुधवारी तत्काळ कारवाई करत एल. एम. केंद्रे, डी. आर. राठोड आणि आर. एस. नागरगोजे या तिघांना निलंबित केलं. 

मंगळवार, 28 एप्रिल रोजी हिंगोली पंचायत समितीत पाणीटंचाई आणि घरकुल योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी तातडीची बैठक बोलावली होती. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, गटविकास अधिकारी माया वानखेडे यांच्यासह सर्व ग्रामसेवकांना हजर राहण्याचे आदेश होते. गावनिहाय पाण्याची स्थिती, पर्यायी उपाययोजना आणि घरकुलांच्या रखडलेल्या कामांवर चर्चा होणार होती.

मात्र, बैठकीत केंद्रे, राठोड आणि नागरगोजे पूर्णपणे गैरहजर राहिले. तर आणखी तीन ग्रामसेवक एक तास उशिरा पोहोचले. पाणीटंचाईसारख्या संवेदनशील विषयावर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत गायकवाड यांनी गैरहजर तिघांना तडकाफडकी निलंबित केलं. उशिरा येणाऱ्या तिघांची एक वेतनवाढही रोखण्याचे आदेश काढले. या थेट कारवाईमुळे ग्रामसेवक संघटनेत एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने ‘कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. 

ॲक्शन मोड’मध्ये जिल्हा परिषद

हिंगोली जिल्हा परिषद (Hingoli Zilla Parishad) आता ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. पाणीटंचाई आणि घरकुलांच्या संथ कामावरून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी कठोर भूमिका घेतली. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या तीन ग्रामसेवकांचे निलंबन तर उशिरा येणाऱ्यांना आर्थिक दणका देण्यात आला. गायकवाड स्वतः पंचायत समिती स्तरावर जाऊन आढावा घेत आहेत. मंगळवारच्या बैठकीत त्यांनी गावनिहाय पाण्याचा हिशेब मागितला आणि घरकुलांच्या अडचणी सोडवण्याच्या सूचनाही दिल्या. अशा महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने प्रशासनाने नाराजी व्यक्त करत थेट कारवाईचा बडगा उगारला.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026