हिंगोली नगर परिषद

हिंगोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माबुद बागवान यांच्याकडून भाजी मंडईची पाहणी

Hingoli Municipal Council: नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माबुद बागवान यांनी आज सकाळी शहरातील मध्यवर्ती भाजी मंडईला अचानक भेट देऊन पाहणी केली. या वेळी भाजी मंडईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे..

हिंगोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माबुद बागवान यांच्याकडून भाजी मंडईची पाहणी

Hingoli Municipal Council

 

स्वच्छतेबाबत तीव्र नाराजी, व्यापाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

​हिंगोली (Hingoli Municipal Council) : नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माबुद बागवान यांनी आज सकाळी शहरातील मध्यवर्ती भाजी मंडईला अचानक भेट देऊन पाहणी केली. या वेळी भाजी मंडईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आणि अस्वच्छतेमुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांना तात्काळ परिसर स्वच्छ करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले.

​सकाळच्या सुमारास उपनगराध्यक्ष माबुद बागवान यांनी भाजी मंडईत फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांशी आणि ग्राहकांशी त्यांनी संवाद साधला. अनेक ठिकाणी कचरा साचलेला पाहून त्यांनी पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना धारेवर धरले व त्वरित स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले. तसेच अस्वच्छतेच्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी भाजीपाला बसवून विक्री करू नये, आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
​
वाहतुकीस अडथळा नको; व्यापाऱ्यांना सूचना
भाजी मंडईत येणाऱ्या नागरिकांना आणि ग्राहकांना फिरताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध न बसता रस्ता मोकळा ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येकाने आपल्या दुकानाभोवती स्वच्छता राखावी आणि कचरा योग्य ठिकाणीच टाकावा, असे त्यांनी व्यापाऱ्यांना बजावले.

​या (Hingoli Municipal Council) पाहणी दरम्यान भाजी मंडईतील काही स्थानिक व्यापारी आणि नागरिक उपनगराध्यक्ष माबुद बागवान यांच्यासोबत उपस्थित होते. उपनगराध्यक्षांनी स्वतः रस्त्यावर उतरून भाजी मंडईतील समस्यांची दखल घेतल्याने परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले. लोकप्रतिनिधीने प्रत्यक्ष जागेवर येऊन दिलेल्या सूचनांचे व्यापाऱ्यांनी सकारात्मक स्वागत केले.

संबंधित सामग्री

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

ताओ दाटेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पाहणी समितीने ५ सप्टेंबर, शनिवार रोजी पाहणी केली.

Sep 05, 2026
नगरपरिषद नगरपंचायत मधील नगराध्यक्षांना असलेले वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार संपुष्टात

नगरपरिषद नगरपंचायत मधील नगराध्यक्षांना असलेले वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार संपुष्टात

Hingoli Municipal Council: राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील नमुना क्रमांक ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी बंधनकारक आहे की नाही याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संभ्रमावर नगर विकास

Sep 04, 2026
लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

Latur Zilla Parishad: 'स्वच्छ भारत मिशन' जिल्हाभरात राबविणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. लिफ्ट महिनोंमहिने बंद आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य

Sep 01, 2026
हिंगोलीतील मोकाट जनावर,भटक्या कुत्र्यासह आदींचे ठराव पारीत

हिंगोलीतील मोकाट जनावर,भटक्या कुत्र्यासह आदींचे ठराव पारीत

Hingoli Stray Animals: हिंगोली नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केंद्रीय निवारण केंद्र, जनावरांची ठिकाने, भु-नक्शा मोजणी व इतर १६ ठरावांना एकमताने पारित केला.

Aug 25, 2026