हिंगोली संघ निवडणुक

हिंगोली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत दहा जागा बिनविरोध 

Hingoli Sangh Elections: हिंगोली तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकांमध्ये १५ जागांपैकी १० बिनविरोध जिंकले गेले. नंतर पाच जागांसाठी मतदान २७ मे रोजी,

हिंगोली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत दहा जागा बिनविरोध 

Hingoli Sangh Elections

 

पाच जागेसाठी २७  मे रोजी होणार निवडणूक, मतमोजणी व निकाल लगेच

हिंगोली (Hingoli Sangh Elections) : हिंगोली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जागोजागी २७ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत १० जागा बिनविरोध निवडून आल्या असून आता पाच जागेसाठी निवडणूक होत आहे. मतदानानंतर मतमोजणी व लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे.

हिंगोली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जागेसाठी हि निवडणूक होत असून यामध्ये १० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.  यामध्ये  सोसायटी मतदारसंघातून सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. इतर मागास प्रवर्गातील एक जागा बिनविरोध, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एक जागा बिनविरोध निवडल्या गेली आहे. तसेच खेडे विभागातील दोन जागा बिनविरोध निवडल्या आहेत.

आता पाच जागेसाठी ही (Hingoli Sangh Elections) निवडणूक होत असून यामध्ये  शहरी विभागातुन दोन जागा महिला राखीवसाठी दोन जागा, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी एक अशा पाच जागेसाठी निवडणूक होत आहे.पाच जागेसाठी नऊ उमेदवार निवडून रिंगणात उभे आहेत. २७ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी चार यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगोली येथे मतदान होणार आहे. मतमोजणी मतदानानंतर लगेच होणार असुन त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

संबंधित सामग्री

‘वोट चोरी, सरकार चोरी, आता पार्टी चोरी!’; राहुल गांधींचा हल्लाबोल

‘वोट चोरी, सरकार चोरी, आता पार्टी चोरी!’; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi: काँग्रेसवरील कारवाईचा संदर्भ देत यापूर्वीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाच्या वादांचाही उल्लेख केला. तसेच, भाजप आणि निवडणूक आयोग संगनमत करून विरोधी पक्षांमध्ये फूट

Sep 18, 2026
भाजपाच्या ‘आवयामी स्थापयामी’ धोरणामुळे निष्ठावंत नाराजच!

भाजपाच्या ‘आवयामी स्थापयामी’ धोरणामुळे निष्ठावंत नाराजच!

BJP Policy: 'आवयामी स्थापयामी' नीतीने गावातील निष्ठावंतांना पदमिळण्याची उचकरी करून भाजपाला जबाबदारी देण्यात आली. रस्ते, पाणी, विकास यांसाठी निवडत असलेला निर्णय, मतदारांचा अपेक्षितपणावर नाही.

Jun 14, 2026