Hingoli, Farmer Dialogue

हिंगोलीत २६ जून रोजी आमदार रोहित पवार यांचा शेतकरी संवाद दौरा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महासचिव आणि युवानेते आमदार रोहितदादा पवार हे येत्या शुक्रवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

हिंगोलीत २६ जून रोजी आमदार रोहित पवार यांचा शेतकरी संवाद दौरा

Hingoli, Farmer Dialogue

हिंगोली (Hingoli, Farmer Dialogue) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महासचिव आणि युवानेते आमदार रोहितदादा पवार हे येत्या शुक्रवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंढरपूर येथे झालेल्या शेतकरी कर्जमुक्ती अन्नत्याग आंदोलनानंतरचा हा त्यांचा पहिलाच हिंगोली दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दौऱ्यादरम्यान सकाळी ९:३० वाजता हिंगोली येथील राष्ट्रवादी भवन येथे आमदार रोहित पवार शेतकरी आणि शेतमजुरांशी थेट संवाद साधणार आहेत. या संवाद बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असून, त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर प्रमुख उपस्थित राहणार असून, ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या शेतकरी संवाद बैठकीस हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रवि शिंदे, विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे, गणेशराव गडदे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनीष आखरे, युवक जिल्हाध्यक्ष सोनू चव्हाण, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जोगदंड यांच्यासह आयुबभाई पठाण, डॉ. संतोष बोंढारे, धीरज काकडे, यशवंतराव देशमुख, गजानन गव्हाणे, शहराध्यक्ष मुजीब पठाण, मोईन बागवान व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) हिंगोली जिल्हा कमिटीच्या वतीने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026