हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय तिरंग्याच्या रंगात उजळले...

Hingoli Collector Office: हिंगोलील जिल्हाधिकारी कार्यालय शनिवार रात्री स्वातंत्र्यदिवसासाठी तिरंग्या रक्षणाचे सज्ज केले गेले आहे. इमारतीची आकर्षक विद्युत रोषणाई करून हिरव्य, भगवती आणि पांढरी

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय तिरंग्याच्या रंगात उजळले...

Hingoli Collector Office

हिंगोली (Hingoli Collector Office) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालय तिरंगी रोषणाईने उजळून निघाले आहे. 15 ऑगस्ट निमित्ताने संपूर्ण इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळी पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

इमारतीच्या खालच्या भागाला हिरव्या रंगाची, वरच्या भागाला भगव्या आणि पांढऱ्या रंगाची लाईट लावण्यात आली आहे. त्यावर गुलाबी, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या लड्यांनी सजावट केल्याने संपूर्ण इमारत तिरंग्यासारखी दिसत आहे. प्रवेशद्वारावर "मध्यवर्ती प्रशासकीय इमारत" या नावाच्या पाटीभोवतीही विशेष लाईट लावण्यात आल्या आहेत. सौर ऊर्जेवर चालणारा स्ट्रीट लाईट आणि आजूबाजूची झाडे या रोषणाईमुळे अधिकच उठून दिसत आहेत.

प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्यदिन अधिक उत्साहात साजरा व्हावा यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इमारतीवर काम सुरू होते आणि आता अंतिम रूप देण्यात आले आहे. संध्याकाळी कार्यालय परिसरातून जाणारे नागरिक आणि तरुण या सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ काढताना दिसत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय हीच जिल्ह्याची मानबिंदू इमारत आहे. तिरंग्याच्या रंगात ती उजळल्याने देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी येथे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार असून त्याआधीच रोषणाईमुळे परिसरात उत्सवाचे वातावरण तयार झाले आहे. एकूणच हिंगोलीकरांसाठी हा स्वातंत्र्यदिन अधिक संस्मरणीय होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

संबंधित सामग्री

प्रतीक्षा साबळेची रांगोळी ठरली आकर्षणाचे केंद्र

प्रतीक्षा साबळेची रांगोळी ठरली आकर्षणाचे केंद्र

Independence Day Rangoli: स्वातंत्र्य दिनानिमित्त रिसोड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर साकारण्यात आलेली आकर्षक आणि हुबेहूब फौजी जवानाची रांगोळी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली

Aug 16, 2026
हिंगोली तहसील कार्यालयातील कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून सखोल आढावा

हिंगोली तहसील कार्यालयातील कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून सखोल आढावा

Collector Rahul Gupta: हिंगोलीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभाग, पृथ्वीराज वितरण योजना इत्यादी प्रलंबित कामांचे तत्काळ निपटण्याच्या मुद्द्यांवर आढावा घेतला.

Jul 02, 2026
कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू

कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजीच्या स्थापनेपासून उपविभागीय स्तरावर सुरू आहे.

Jun 10, 2026