हिंगोली शासकीय रुग्णालय

हिंगोलीतील शासकीय रुग्णालयाच्या छतावर बियअरच्या बाटल्या?

Hingoli Government Hospital: हिंगोलीतील जिल्हा रुग्णालयाच्या छतावर तीन गोणी भरून असलेल्या बियारच्या बाटल्यांमुळे समाजात फोटो वायरल झाला. आरोप आहे की प्रशासनाने नोंदवलेली साक्षीपत्रे

हिंगोलीतील शासकीय रुग्णालयाच्या छतावर बियअरच्या बाटल्या?

Hingoli Government Hospital


मुद्दाम खोडसाळ पणा केल्याचा अधिष्ठात्यांचा आरोप

हिंगोली (Hingoli Government Hospital) : येथील जिल्हा रुग्णालयाच्या  छतावर बियरच्या रिकाम्या बाटल्यांचा  खच सापडल्याचे वृत्त समाज माध्यमांवरून शनिवारी पहाटेपासून फिरत आहे. अधिष्ठाता डॉ. श्रीधर मुंगल यांनी मात्र हा मुद्दाम केलेला  खोडसाळपणा असल्याचा आरोप केला आहे.

शनिवारी पहाटेपासून हिंगोलीतील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपसहीत अन्य समाज माध्यमांवर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये छतावर तीन गोणी भरून व त्याच्या आजूबाजूला अनेक बियअरच्या बाटल्या असल्याचे दिसत आहे. या फोटोसहीत शासकीय रुग्णालयात  अनेक गैरसोयी असताना कर्मचारी मात्र मौजमजा करीत असल्याचे आरोप  करण्यात आले आहेत.

या (Hingoli Government Hospital) बाबत शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीधर मुंगल यांनी रुग्णालयाच्या छतावर असलेल्या साहित्याचे निर्लेखन करण्यासाठी समितीने शुक्रवारी ३ जुलै रोजी तपासणी केली. यावेळी छतावर काहीच दिसून आले नाही असे स्पष्ट  करून रुग्णालय प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी खोडसाळपणाने हा  प्रकार केला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या बाबत रुग्णालय प्रशासनाला सीसीटिव्हीचे फुटेज तपासून चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

नागपुरात 500-600 बनावट दस्तनोंदणींचा आरोप; तात्काळ विभागीय चौकशीची युवक काँग्रेसची मागणी

नागपुरात 500-600 बनावट दस्तनोंदणींचा आरोप; तात्काळ विभागीय चौकशीची युवक काँग्रेसची मागणी

नागपुरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्र. 5 आणि इतर कार्यालयांमध्ये 500-600 बनावट दस्तनोंदणी झाल्याचा युवक काँग्रेसचा आरोप असून तातडीने विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Sep 21, 2026
१२.४० कोटींच्या कर्जप्रकरणी विकासक विजय रौंदळ यांच्यावर गुन्हा

१२.४० कोटींच्या कर्जप्रकरणी विकासक विजय रौंदळ यांच्यावर गुन्हा

पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पोलिसांनी वाजव्या पद्धतीने करज वसूल करण्याच्या आरोपासह, १२.४० कोटींवर करज होणाऱ्या प्रकरणात व्रतकर्तेवर 'बनावट विक्रीखत', अवाजव्या रकमेचे मागणी करणे आदी आरोप केले आहेत. यातील पोलिसांचा गुन्हा दाखला दाखल झाला आहे. प्रकरणातील तपासात कागदपत्रांचे दुरुस्ती व द्रव्यवाहतीचा अभ्यास चालू आहे.

Sep 03, 2026
ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही 268 शिक्षक बदली प्रकरणात फौजदारी कारवाईला टाळाटाळ

ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही 268 शिक्षक बदली प्रकरणात फौजदारी कारवाईला टाळाटाळ

अकोला जिल्हा परिषदेतील 268 शिक्षकांच्या बदली प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले होते.

Sep 03, 2026