हिंगोली बँक कर्ज वितरण

हिंगोली जिल्ह्यातील बँकांना 4 हजार 313 कोटींचे कर्ज वितरण उद्दिष्ट 

Hingoli Bank Loan: हिंगोली जिल्ह्यातील बँकांना 4,313 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट वार्षिक ऋण योजना 2026-27चे प्रकाशन करण्यात आले. योजनेत कृषी कर्ज, उद्योग, शासकीय योजनांचा समावेश

हिंगोली जिल्ह्यातील बँकांना 4 हजार 313 कोटींचे कर्ज वितरण उद्दिष्ट 

Hingoli Bank Loan

 

वार्षिक ऋण योजना 2026-27 चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते प्रकाशन

हिंगोली (Hingoli Bank Loan) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यासाठीच्या वार्षिक ऋण योजना उद्दिष्ट अहवाल 2026-27चे प्रकाशन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. या वार्षिक ऋण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी पीक कर्ज, कृषी पूरक व जोडव्यवसाय कर्ज, शासकीय योजनांतर्गत उद्योग कर्ज, प्राधान्य क्षेत्र तसेच अग्रक्रम नसलेल्या क्षेत्रातील विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या (Hingoli Bank Loan) योजनांसाठी जिल्हाभरातील बँकांना एकूण 4 हजार 313 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या बैठकीत नाबार्डच्या युनिट कॉस्ट पुस्तिकेचे सर्व बँकांना वितरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला. शेतकरी, उद्योजक तसेच पात्र लाभार्थ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी (Hingoli Bank Loan) बँकांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लहाने, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे श्री. गलांडे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे श्री. बनसोड तसेच जिल्हाभरातील विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Sep 30, 2026
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू

Sep 27, 2026
जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

Hingoli District Drought: एल निनो'चा इशारा आणि अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाने गाठलेली सरासरी या फेऱ्यात जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व तूर

Sep 24, 2026
हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत यंदा १७१० ठिकाणी गणेश स्थापना झाली; मात्र ‘एक गाव एक गणपती’ची संख्या ३०५ वरून १९१ वर घटल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Sep 15, 2026