हिंगोली (Ghar Ghar Tiranga) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 12 ऑगस्ट रोजी सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयातील NCC कॅडेट्सनी हातात तिरंगा घेऊन प्रभात फेरी काढली. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अनिल कुमार भारूका, मुख्याध्यापिका एम. एस. गुंडेकर , NCC फर्स्ट ऑफिसर सोनल जैस्वाल यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थिनी आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.