कांदा लसणाचा वाहनाचा  अपघात, एक ठार तर दोन  जखमी

कांदा लसणाचा वाहनाचा  अपघात, एक ठार तर दोन  जखमी

Highway Accident

खानापूर चित्ता (Highway Accident) : बुधवार २ एप्रिल रोजी मध्यरात्री अंदाजे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर कांदा व लसूण घेऊन जाणारे दोन वाहन रस्त्याच्या कडेला खाली उतरून खोलदरीत गेल्याने या अपघातात एक ठार तर दोन  गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये मध्यरात्री शासकीय रुग्णवाहिकेद्वारे  हलविण्याची माहिती मिळाली आहे.

हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक १६१ वर खानापूर चित्ता जवळ २ एप्रिल रोजी मध्यरात्री अंदाजे  दोन अडीच  वाजण्या सुमारास ट्रक क्रमांक आर.जे.09 GE 1356 लसणाने भरलेला भार वाहतूक करणारा ट्रक पिकअप वाहनाला जोराची धडक देऊन रस्त्याच्या कडेला उतरून त्या पाठोपाठ महिंद्रा पिकप क्रमांक एम एच ३० बि डी 6279 हा कांदा घेऊन जाणार पिकप  रस्त्याच्या कडेला उतरून त्यामध्ये पिकप चालक  दिलीप दयाराम करवते  रा. टोसगाव तालुका पातुर जिल्हा अकोला  तर पिकप मधील जखमी मुरलीधर त्र्यंबक पोवाले रा. तोसगाव व ट्रक मधील कमल सिंह  जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळालेली आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील  पिकअप क्रमांक एम एच 30  बिडी 62 79 हा कांदे घेऊन नांदेड येथील बाजारामध्ये जात असताना खानापूर चित्ताजवळील राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास सुसाट  वेगाने येणाऱ्या ट्रकने पिकप ला जोराची धडक दिल्याने पिकप व ट्रक रोडच्या खाली उतरून दरीत गेल्याने पिकप चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी मध्ये पिकप मधील एक तर ट्रक मधील एक आहे. सदरील अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे, बीट अमलदार अनिल डुकरे सहकारी वाटोरे, गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन मृत व जखमींना  त्वरित रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू असताना मागील वर्षी याच ठिकाणी दोन मोटर सायकल स्वाराचा अपघात होऊन दोन जण मृत्यू झाले होते. त्याच ठिकाणी  हे दोन वाहन रस्त्याच्या खाली उतरून खोलदरीत गेल्याने दोन वाहनांमधील पिकपमधील चालक ठार झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर वाहने चालू असतानाही अपघात घडलेल्या जखमींना कोणीतरी अज्ञातानी 102 वर कॉल करून जागेची ठिकाण सांगितल्याने त्वरित कळमनुरी रुग्णालयाची रुग्णवाहिका दाखल होऊन सदरील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026