जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची संयुक्त मोहीम २० एप्रिलपासून सुरू

जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी दुचाकीस्वारां मध्ये सुरक्षितते बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हेल्मेट सक्तीची संयुक्त मोहीम सोमवार २० एप्रिलपासून राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची संयुक्त मोहीम २० एप्रिलपासून सुरू

Helmet Mandatory

हिंगोली (Helmet Mandatory) : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी दुचाकीस्वारां मध्ये सुरक्षितते बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हेल्मेट सक्तीची संयुक्त मोहीम सोमवार २० एप्रिलपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे हेल्मेट न घालणार्‍या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९/१७७ अन्वये हेल्मेट परिधान न करणार्‍या चालकांवर कारवाईची तरतूद असून, या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली, शहर वाहतूक शाखा, हिंगोली तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे, याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली निर्देश देण्यात आले आहेत. ही संयुक्त मोहीम २० एप्रिल ते ३० मे २०२६ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या कालावधीत हेल्मेट न वापरणार्‍या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहन चालक व मालकांनी वाहन चालविताना अनिवार्यपणे हेल्मेट परिधान करावे, अन्यथा मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026