Harshwardhan Sapkal

डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसचा तीन दिवसांचा दुखवटा; 'गुंगी गुडिया' वक्तव्यावर सपकाळांचे स्पष्टीकरण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर महाराष्ट्र काँग्रेसने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसचा तीन दिवसांचा दुखवटा; 'गुंगी गुडिया' वक्तव्यावर सपकाळांचे स्पष्टीकरण

Harshwardhan Sapkal

सुनेत्रा पवारांवरील टीकेचं समर्थन; राष्ट्रवादी आणि भाजपवरही हर्षवर्धन सपकाळ यांचा निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर महाराष्ट्र काँग्रेसने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, काँग्रेस पक्षाने एक अनुभवी नेता आणि शिक्षण क्षेत्रातील मोठं व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त केली. वयाच्या ९०व्या वर्षी कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याचे सांगताना सपकाळ यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असतानाच काँग्रेसनेही तीन दिवस शोक पाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या शब्दप्रयोगावरही सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली. सार्वजनिक जीवनातील नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित असते, मात्र संबंधित घडामोडींवर सुनेत्रा पवार मौन बाळगत असल्यामुळे हा शब्दप्रयोग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सपकाळ म्हणाले की, पत्रकारांशी उद्धट भाषेत वागणाऱ्या व्यक्तीला रोखण्याची जबाबदारी नेतृत्वाची असते. मात्र, अशा प्रसंगी उपमुख्यमंत्री कोणतीही भूमिका घेत नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्याच पार्श्वभूमीवर 'गुंगी गुडिया' हा शब्द वापरण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या टीकेचं समर्थन करताना त्यांनी म्हटलं की, सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावरील अहवाल, गुन्हा दाखल करण्याचा मुद्दा तसेच अर्थ खात्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. भाजपच्या दबावामुळे त्या बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. संवैधानिक पदावरील व्यक्तींनी अधिक सक्रिय भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

इतिहासाचा संदर्भ देताना सपकाळ यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी 'गुंगी गुडिया' असे संबोधले जात होते. मात्र, त्यांनी आपल्या कामगिरीतून स्वतःची ओळख निर्माण केली आणि पुढे त्यांना 'दुर्गा' अशी उपमा मिळाली. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कार्यातून उत्तर द्यावे, असे त्यांनी म्हटले. त्यांनी अर्थ खाते स्वीकारून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह स्मार्ट मीटरचा प्रश्न सोडवावा आणि अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही केली.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना सपकाळ यांनी पक्ष भाजपच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. तसेच, राष्ट्रवादीतील मंत्र्यांच्या खात्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देत नसल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाने पक्षाला दिलेल्या पत्राचाही उल्लेख करत, पक्षातील नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन करण्याऐवजी ठोस निर्णय घेण्याचा सल्लाही त्यांनी राष्ट्रवादीला दिला.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026