सेनगाव बायोगॅस हॉटेल

बायोगॅसवर धावते सेनगावातील ‘ग्रीन हॉटेल’

Sengaon Biogas Hotel: सेनगावातील तरुण उद्योजक विजय गाढवे यांनी हॉटेलमध्ये बायोगॅसचा वापर सुरू केला आहे.

बायोगॅसवर धावते सेनगावातील ‘ग्रीन हॉटेल’

Sengaon Biogas Hotel


तरुण उद्योजक विजय गाढवे यांचा पर्यावरण पूरक प्रयोग
इंधन खर्चात मोठी बचत

सेनगाव (Sengaon Biogas Hotel) : वाढत्या गॅस दरांमुळे सर्वसामान्यांसह हॉटेल व्यावसायिकांचे अर्थकारण कोलमडत असताना, सेनगाव शहरातील तरुण उद्योजक विजय गाढवे यांनी पर्यावरणपूरक ऊर्जेचा अभिनव पर्याय स्वीकारत आपल्या हॉटेलमध्ये बायोगॅसचा यशस्वी वापर सुरू केला आहे. पारंपरिक एलपीजी सिलिंडरला पर्याय म्हणून उभारण्यात आलेला हा ‘ग्रीन हॉटेल’चा प्रयोग सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

गाढवे यांनी हॉटेलच्या मागील बाजूस फ्लेक्सी (बॅग टाईप) बायोगॅस प्लांट उभारला असून, त्यामध्ये गायीचे शेण व सेंद्रिय कचऱ्याचा वापर केला जातो. या प्रक्रियेतून तयार होणारा बायोगॅस थेट हॉटेलमधील स्वयंपाकासाठी वापरला जात आहे. विशेष म्हणजे या प्रयोगामुळे इंधन खर्चात मोठी बचत होत असून, धूर व प्रदूषणातही लक्षणीय घट झाली आहे.
“सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे खर्चाचा ताळमेळ बसविणे कठीण होत होते. कायमस्वरूपी आणि पर्यावरणपूरक उपाय म्हणून बायोगॅसचा पर्याय निवडला. आता खर्च कमी झाला असून, स्वच्छ ऊर्जेचाही लाभ मिळत आहे,” असे विजय गाढवे यांनी सांगितले.

या (Sengaon Biogas Hotel) अभिनव उपक्रमामुळे परिसरातील इतर हॉटेल चालक, शेतकरी आणि तरुण उद्योजकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करत ऊर्जानिर्मिती करण्याचा हा प्रयोग ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ ऊर्जेला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांना शासन व प्रशासनाने प्रोत्साहन देण्याची मागणीही नागरिकांतून होत आहे. सेनगावात सुरू झालेला हा ‘ग्रीन हॉटेल’चा प्रयोग भविष्यात ग्रामीण उद्योजकतेसाठी आदर्श मॉडेल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीकरांच्या उत्स्फूर्त सहभागाने सायकल रॅलीने वेधले लक्ष; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

हिंगोलीकरांच्या उत्स्फूर्त सहभागाने सायकल रॅलीने वेधले लक्ष; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

Hingoli Cycle Rally: हिंगोलीतील सायकल रॅलीत जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनाचे आयोजन करण्यात आले. हिंगोलीच्या सायकल असोसिएशन, सद्भाव ह्यूमन डेव्हलपमेंट फाउंडेशन

Jun 03, 2026
दिल्लीतील मालवीय नगर हादरले; लेमन ग्रीन हॉटेलमधील आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू

दिल्लीतील मालवीय नगर हादरले; लेमन ग्रीन हॉटेलमधील आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू

राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली.

Jun 03, 2026
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेत वराह पालनाचा समावेश;वराह पालनासाठी ४% व्याज सवलत; पशुपालकांना दिलासा

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेत वराह पालनाचा समावेश;वराह पालनासाठी ४% व्याज सवलत; पशुपालकांना दिलासा

राज्यातील पशुधन क्षेत्राला चालना देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वराह (डुक्कर) पालनास प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Apr 13, 2026