व्हायरल व्हिडिओ व वृत्तपत्रातील चुकीच्या बातमीविरोधात माडेआमगाव ग्रामस्थांची पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, ५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

व्हायरल व्हिडिओ व वृत्तपत्रातील चुकीच्या बातमीविरोधात माडेआमगाव ग्रामस्थांची पत्रकार परिषद

Gramsevak Suresh Pungati

प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

घोट (Gramsevak Suresh Pungati) : माडेआमगाव येथील ग्रामसेवक सुरेश मंगु पुंगाटी यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ आणि काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी वस्तुस्थितीविरुद्ध व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकारी, पेसा समिती सदस्य आणि ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात घोट येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, ५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसेवक सुरेश पुंगाटी हे नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत होते. त्याचवेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते टेबलजवळ कोसळले. या घटनेच्या वेळी सरपंच, प्रशासकीय समिती सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

घटनेनंतर उपस्थितांनी तातडीने प्रथमोपचाराची व्यवस्था केली. आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण (शुगर) ३५० पेक्षा अधिक असल्याचे तसेच रक्तदाबही वाढलेला असल्याचे आढळून आले. आवश्यक उपचारानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती स्थिर झाली व ते शुद्धीवर आले.

मात्र, या घटनेची संपूर्ण माहिती समोर येण्यापूर्वीच काही व्यक्तींनी त्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काढून सोशल मीडियावर प्रसारित केली. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचा दावा करण्यात आला, जो पूर्णपणे चुकीचा असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. या माध्यमातून ग्रामसेवकांसह संपूर्ण गावाची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.

याप्रकरणी विस्तार अधिकारी निंदेकर आणि पेसा समन्वयक निकुरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. तसेच ग्रामसेवकांसोबत अपूर्ण पीएम जनमन घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून लाभार्थ्यांना कामे पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. यासंदर्भातील छायाचित्र पुरावे उपलब्ध असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करून बदनामी करणाऱ्या संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माडेआमगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

या पत्रकार परिषदेला सरपंच (प्रशासक) अमोल भिवा पुंगाटी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कोको नरोटे, रावजी भूचा मोहंदा, गिरजाबाई पुरुषोत्तम नरोटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक श्रीरंग मेश्राम, ग्रामकोष अध्यक्ष रावजी ठूसी मोहंदा तसेच प्रतिष्ठित नागरिक शामराव सोनू पुंगाटी, महेश बहुजी कुळमेटी, रामदास मडावी, पुरुषोत्तम धर्मा नरोटे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित सामग्री

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला ‘मफलर’ नेत्याचा पर्दाफाश करण्याची घोषणा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला ‘मफलर’ नेत्याचा पर्दाफाश करण्याची घोषणा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला VSR कंपनी आणि ‘मफलर’ नेत्याबाबत पुरावे मांडणार.

Sep 28, 2026
स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ एसटी बस पलटली.

Sep 18, 2026
गडचिरोलीत स्कार्पिओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

गडचिरोलीत स्कार्पिओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

स्कार्पिओ वाहनात वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले केतन पोचमपल्लीवार मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.

Sep 06, 2026
गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; सिरोंच्यात ३.६ तीव्रतेची नोंद

गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; सिरोंच्यात ३.६ तीव्रतेची नोंद

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

Sep 03, 2026
कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

नगरपंचायतीचा दर्जा मिळून दशक पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही कोरची शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे.

Aug 27, 2026