ग्रामपंचायत वाईगौळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

मानोरा तालुक्यातील वाईगौळ ग्रामपंचायतने महाआवास अभियान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२३-२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे.

ग्रामपंचायत वाईगौळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

Gram Panchayat Award

मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

मानोरा (Gram Panchayat Award) : मानोरा तालुक्यातील वाईगौळ ग्रामपंचायतने महाआवास अभियान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२३-२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच उमेश राठोड महाराज व ग्रामविकास अधिकारी विद्या मारोटकर यांना सातारा येथे प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. वाईगौळ ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक मिळाल्याने जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे वाईगौळ येथे महाआवास प्रधानमंत्री योजना ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध राबविली. केंद्र व राज्य शासनाने याबाबत दखल घेऊन २०२३-२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून महाआवास प्रधानमंत्री योजना ग्रामीण अभियान पुरस्कारासाठी तृतीय क्रमांकाच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

सदर निवड ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने करण्यात आली असून केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मंत्रालयाकडून ही निवड करण्यात आली.

गावकरी मंडळी, उपसरपंच, सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026