हिंगोली डिझेल पुरवठा

 शासकीय कामे सुरळीत चालण्यासाठी डिझेल पुरवठ्याला परवानगी

Hingoli Diesel Supply: जिल्हा पुरवठा विभागाने शासकीय कामांसाठी डिझेल पुरवठ्याची परवानगी देऊन ग्रामीण क्षेत्रातील पाणीपुरवठा, आरोग्यसेवा इत्यादींना गती देण्याचा निर्णय

 शासकीय कामे सुरळीत चालण्यासाठी डिझेल पुरवठ्याला परवानगी

Hingoli Diesel Supply

 

जिल्हा पुरवठा विभागाचा महत्त्वाचा निर्णय

हिंगोली (Hingoli Diesel Supply) : जिल्ह्यातील अत्यावश्यक शासकीय कामे आणि सेवा खंडित होऊ नयेत यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी 22 मे रोजी आदेश काढून शासकीय कामांसाठी तसेच दवाखाने यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी डिझेल पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. 

कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, 136 इन्फ. बटालियन, टाटा पावर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड यांच्या मागणीनंतर हा आदेश जारी करण्यात आला. पेट्रोलियम अधिनियम 1934 व पेट्रोलियम नियम 2002 च्या तरतुदींनुसार, आता अधिकृत गरज असलेल्या शासकीय कार्यालयांना व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या संस्थांना डिझेलचा पुरवठा करता येणार आहे. 

या (Hingoli Diesel Supply) निर्णयानुसार, इंधन देताना संबंधित शासकीय वाहनाचा ब्राऊझर क्रमांक किंवा कार्यालयाचा अधिकृत आदेश तपासणे बंधनकारक असेल. तसेच ओळखपत्र व अधिकृत पत्र पाहूनच डिझेल दिले जाईल. प्रत्येक व्यवहाराची स्वतंत्र नोंद ठेवणे, सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवणे आणि साठवणुकीची मर्यादा न ओलांडणे या अटी पेट्रोल पंप चालकांवर बंधनकारक करण्यात आल्या आहेत. 

जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि इतर महत्त्वाच्या शासकीय कामांना गती मिळणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पेट्रोलियम अधिनियम 1934 व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार फौजदारी कारवाईचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे. या आदेशाची प्रत पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सर्व पेट्रोल पंप मालकांना पाठवण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Sep 30, 2026
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू

Sep 27, 2026
जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

Hingoli District Drought: एल निनो'चा इशारा आणि अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाने गाठलेली सरासरी या फेऱ्यात जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व तूर

Sep 24, 2026
हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत यंदा १७१० ठिकाणी गणेश स्थापना झाली; मात्र ‘एक गाव एक गणपती’ची संख्या ३०५ वरून १९१ वर घटल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Sep 15, 2026