औंढा नागनाथ (Female heatstroke death) : तालुक्यातील गोजेगाव येथे एका ४८ वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना दिनांक २६ एप्रिल रोजी घडली आहे दुपारी शेतातून घरी आल्यानंतर दीड वाजता अचानक चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने गावातील नागरिकांनी त्या महिलेला औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उष्माघाताचा हा औंढा नागनाथ तालुक्यातील पहिला बळी ठरला आहे असून मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे, तापमान ४१ अंशाच्या पुढे गेले आहे.
अरुणा संजय सांगळे वय ४८ वर्ष असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या त्या महिलेचे नाव आहे. ग्रामीण भागात सध्या शेतातील हळद काढणीसह इतर शेतीची कामे केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने दिनांक २६ एप्रिल रोजी त्या शेतात गेल्या होत्या दुपारी शेतातून घरी आल्या आणि (Female heatstroke death) अचानक चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने गावातील शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सांगळे, अच्युतराव नागरे, गजानन सांगळे,हनुमान सांगळे, धुरपताबाई नागरे यांनी वाहनाद्वारे तात्काळ अरुणा सांगळे यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दरम्यान सायंकाळी शेवविच्छेदन करून (Female heatstroke death) मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे सेवाविछेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. परंतु सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने हा मृत्यू उष्माघातानेच झाला असावा ,असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. घटने प्रकरणी अद्याप औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली नव्हती.