गिरीश महाजन

संकटमोचक गिरीश महाजन यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत 

गिरीश महाजन: महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचे संकटमोचक आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेते म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय प्रवासाबाबत मोठे संकेत

संकटमोचक गिरीश महाजन यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत 

Girish Mahajan

जळगाव (गिरीश महाजन) : महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचे संकटमोचक आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेते म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय प्रवासाबाबत मोठे संकेत दिले आहेत. "सात टर्म झाल्या... आता फार फार तर एखादी टर्म. कुठेतरी आपणही थांबलं पाहिजे," असे वक्तव्य करत महाजन यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारातून विविध शासकीय कार्यालयांचे उद्घाटन आणि विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी केवळ निवृत्तीचे संकेतच दिले नाहीत, तर जळगाव भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. "आम्ही आता किती दिवस काम करणार? पक्षाची धुरा सक्षम हातात द्यावी लागेल आणि मंगेश चव्हाण हेच जिल्ह्याचे भावी नेतृत्व करू शकतात," असे जाहीरपणे सांगत त्यांनी पुढील नेतृत्वाकडे अंगुलिनिर्देश केला.

मंगेश चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करताना महाजन म्हणाले की, पहिल्यांदा उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती. मात्र, आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा अक्षरशः धडाका लावला असून त्यांच्या कामाचा हेवा वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

याचवेळी महाजन (Girish Mahajan) यांनी नाव न घेता आपल्या राजकीय विरोधकांवरही निशाणा साधला. "कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे. नाहीतर काही जण प्रत्येक ठिकाणी 'मीच मीच' करत राहतात," असा टोला लगावत त्यांनी दीर्घकाळ सत्तेभोवती फिरणाऱ्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे जळगाव भाजपमधील वर्चस्व निर्विवाद मानले जाते. त्यामुळे त्यांच्या तोंडूनच उत्तराधिकाऱ्याचे नाव पुढे आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू होणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाजन यांच्या या वक्तव्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

संबंधित सामग्री

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
मराठा आरक्षणावर जरांगेंची ‘ही’ मागणी मान्य होणार नाही; गिरीश महाजन म्हणाले, ‘कायद्यात बसत नसेल तर आग्रह धरू नये’

मराठा आरक्षणावर जरांगेंची ‘ही’ मागणी मान्य होणार नाही; गिरीश महाजन म्हणाले, ‘कायद्यात बसत नसेल तर आग्रह धरू नये’

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या मागण्या मान्य करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

Sep 16, 2026
५८ लाख कुणबी नोंदींची प्रक्रिया सुरू, तरीहि जरांगेंच आंदोलन कायम? सरकारमध्ये नाराजीचा सूर

५८ लाख कुणबी नोंदींची प्रक्रिया सुरू, तरीहि जरांगेंच आंदोलन कायम? सरकारमध्ये नाराजीचा सूर

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मंत्रिमंडळात चर्चा; ५८ लाख कुणबी नोंदी आणि मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या पुढील भूमिकेकडे लक्ष.

Sep 16, 2026
रायगड-नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; भरत गोगावले आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती

रायगड-नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; भरत गोगावले आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती

महाराष्ट्रातील पालकमंत्रिपदाबाबत गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

Aug 17, 2026
गिरीश महाजन-विजय चौधरी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल; एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यांचा दावा

गिरीश महाजन-विजय चौधरी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल; एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यांचा दावा

भारतीय जनता पक्षाचे (BJP) उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Jul 30, 2026