गिरगाव खुनाची खोटी माहिती

गिरगाव येथे सासुच्या खुनाची खोटी माहिती डायल ११२ वर दिल्याने गुन्हा दाखल

Girgaon Police Dial 112: गिरगाव तालुक्यातील पियुष वाघमारे यांनी ११२ क्रमांकावर खोटी माहिती सांदा घेतली, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची निष्प्रयोग झाली.

गिरगाव येथे सासुच्या खुनाची खोटी माहिती डायल ११२ वर दिल्याने गुन्हा दाखल

Girgaon Police Dial 112

 

डायल ११२ क्रमांकाच्या वाहनाचा दुरूपयोग भोवला

हिंगोली (Girgaon Police Dial 112) : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे एका व्यक्तीने माझ्या सासुच्या खुन झाला असल्याने तात्काळ पोलिसांची मदत मिळावी, या संदर्भात डायल ११२ क्रमांकावर संपर्क साधला. काही वेळातच डायल ११२ क्रमांकाचे वाहन घटनास्थळी पोचले परंतु ही खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने कुरूंदा पोलिसात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला.

या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील गिरगाव येथील पियुष वाघमारे याने २५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कुरूंदा पोलिस ठाण्याच्या डायल ११२ क्रमांकावर संपर्क साधून माझ्या सासुचा खुन झाला आहे. तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. खुनासारखी गंभीर घटना समजल्यानंतर पोलिसांचे डायल ११२ हे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहचले. यावेळी जमादार राजीव जाधव यांच्यासह कर्मचार्‍यांनी पियुष वाघमारे यांच्या पाहणी केली असता खुनासारखी कोणतीही घटना त्यांच्या निर्दशनास आली नाही.

अधिकची माहिती घेतल्यानंतर वाघमारे यांची सासु गावात राहत नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर गावातील पोलिस पाटलासह इतरांना पोलिसांनी घटनास्थळी बोलावून घेतल्यानंतर पंचनामा केला. सदर प्रकरणात राजीव जाधव यांनी २६ ऑगस्ट रोजी कुरूंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पियुष वाघमारे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मन्मथ नरडीले हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

मुंबईच्या ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

मुंबईच्या ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Mumbai Taj Hotel bomb threat: मुंबईच्या प्रसिद्ध ताज हॉटेलला रविवारी सकाळी बॉम्बची धमकी मिळाल्याने घबराट पसरली. धमकी मिळताच, सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत हॉटेलची कसून तपासणी

Jul 13, 2026
परभणीत खरी पिस्तूल असल्याचा बनाव करून दहशत माजवणारा इसम केले जेरबंद

परभणीत खरी पिस्तूल असल्याचा बनाव करून दहशत माजवणारा इसम केले जेरबंद

Parbhani Pistol Terror: परभणी येथे सोनपेठ जिल्ह्यातील महातपुरी फाट्यावर, एका व्यक्तीने बनावट पिस्तूल बनवून सोशल मीडिया व ग्रुपवर शस्त्रासंबंधी फोटो प्रसारित

May 13, 2026