परभणी विज समस्या

परभणीत विजेची समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी, औषधाची बॉटल घेउन खळी ग्रामस्थ पोहचले विज महावितरणच्या कार्यालयात...!

Parbhani Electricity Issues: गंगाखेड तालुक्यातील खळी गावात चांगल्या विद्युत पुरवठ्याच्या अस्थिरतेमुळे पाण्याचे कडकुण्हाळणी आणि नदीपात्राच्या समस्या निर्माण झाली आहेत.

परभणीत विजेची समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी, औषधाची बॉटल घेउन खळी ग्रामस्थ पोहचले विज महावितरणच्या कार्यालयात...!

Parbhani Electricity Issues

परभणी (Parbhani Electricity Issues) : गंगाखेड  विजेच्या समस्येमुळे त्रस्त झालेले तालुक्यातील खळी गाव, शिवारातील ग्रामस्थ विषारी औषधाची बॉटल घेऊनच विज महावितरण कंपनीच्या कार्यालयात पोहचल्याने गुरुवार ११ जून विज कंपनीच्या कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली होती. प्रभारी उपविभागीय अभियंता पंकज गुहे यांनी ग्रामस्थांची समज काढत समस्या दूर करण्याचे आश्वासन दिल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

गंगाखेड तालुक्यातील खळी गावासह संपूर्ण शिवारात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने व लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यामुळे सतत विज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे खळी गाव शिवारात पाण्यासह अन्य समस्या निर्माण झाल्यामुळे व गोदावरी नदी पात्र तसेच पाणी पुरवठ्याच्या विहिरीत पाणी असुन सुद्धा कडक उन्हाळ्यात ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत मागील अनेक दिवसांपासून (तांत्रिक तंत्रज्ञ) लाईनमॅनकडे वेळोवेळी तक्रार करून (Parbhani Electricity Issues) विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करून सुद्धा हे काम होतं नसल्यामुळे खळी येथील प्रदिप गौरशेटे, पूर्नवसन खळी येथील माधव गात, वामन ढोबळे, माधव पिसाळ आदींनी गुरुवार ११ जून रोजी विषारी औषधाची बॉटल सोबत घेउन थेट विज महावितरण कंपनीचे गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून प्रभारी उपविभागीय अभियंता पंकज गुहे यांच्या सोबत चर्चा करतांना आमच्या गाव परिसरातील विज समस्या सोडविणार की नाही हे सांगा असे म्हणत आणलेल्या विषारी औषधाच्या बॉटलीतील औषधं घेणार असल्याचे सांगून आमच्या परिसरातील विज समस्या सोडवा किंवा आम्हाला येथेच विषारी औषध प्राशन करू द्या असे म्हटल्याने दुपारी अंदाजे १२ वाजेच्या सुमारास विज वितरण कंपनीच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.

यावेळी उपस्थित प्रभारी उपविभागीय अभियंता पंकज गुहे, ग्रामीणचे अभियंता रविंद्र चकोले यांनी घटनेचे प्रसंगावधान राखून ग्रामस्थांची समस्या ऐकून घेत त्यांची समज काढून वाकलेले विजेचे खांब व्यवस्थित करून लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या ओढून घेत रोहित्रावरील मोडकळीस आलेले फ्युज बॉक्स लवकरच बदलून घेण्याच्या सूचना संबंधित लाईनमॅनला दिल्याने ग्रामस्थांचे समाधान केले. (Parbhani Electricity Issues) विजेची समस्या दूर नाही झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला.

संबंधित सामग्री

वीज बिल थकलं तर कर्मचारी घरी येणार नाही; थेट सर्व्हरवरून लाईट कट!

वीज बिल थकलं तर कर्मचारी घरी येणार नाही; थेट सर्व्हरवरून लाईट कट!

महावितरणच्या नव्या डिजिटल प्रणालीद्वारे थकीत वीज बिलावर मुख्य सर्व्हरमधून वीजपुरवठा स्वयंचलितपणे बंद केला जाणार आहे. थकीत रक्कम भरल्यानंतर ३० मिनिटांत वीज सुरू होईल.

Sep 15, 2026
नागपुरात क्लोरीन गॅसची गळती; 52 जण रुग्णालयात, 200 मीटर परिसर सील

नागपुरात क्लोरीन गॅसची गळती; 52 जण रुग्णालयात, 200 मीटर परिसर सील

नागपूरच्या गोधणी परिसरात मध्यरात्री क्लोरीन गॅसची गळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Aug 24, 2026
परभणीत महावितरणच्या दर्गा रोड ३३ केव्ही फिडरला भीषण आग

परभणीत महावितरणच्या दर्गा रोड ३३ केव्ही फिडरला भीषण आग

Parbhani Mahavitaran fire: शहरातील जिंतूर रोडवरील महावितरण कार्यालय परिसरातील दर्गा रोड सब-स्टेशनच्या १० मेगा होल्टएंपियर क्षमतेचा पावर ट्रांसफार्मर तांत्रिक बिघाडामुळे निकामी झाल्याने भीषण आग..

Aug 21, 2026
औषधे नसल्याने संताप! उपजिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णाच्या वडिलांचे ‘भीक मागो’ आंदोलन

औषधे नसल्याने संताप! उपजिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णाच्या वडिलांचे ‘भीक मागो’ आंदोलन

Bhik Mago Andolan: पजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच, याचा निषेध म्हणून एका रुग्णाच्या वडिलांनी चक्क ‘भीक मागो’ आंदोलन

Aug 07, 2026