पोटच्या मुलानेच केला बापाचा खून; आरमोरीत थरारक घटना

आरमोरी तालुक्यातील पालोरा येथे कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा कुन्हाडीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पोटच्या मुलानेच केला बापाचा खून; आरमोरीत थरारक घटना

Gadchiroli Crime

गडचिरोली (Gadchiroli Crime) : आरमोरी तालुक्यातील पालोरा येथे कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा कुन्हाडीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा योगेश धकाते (२५) याला अटक केली आहे.

बहिणीशी फोनवर बोलत असतानाच हल्ला

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत देवाजी आडकू धकाते (६५) हे १२ एप्रिलच्या रात्री वीटभट्टीवरून घरी परतत होते. त्यावेळी ते मुलगी निकिताशी मोबाईलवर बोलत होते. याच दरम्यान बोगद्याजवळ दबा धरून बसलेल्या योगेशने मागून कुन्हाडीने सपासप वार केले. “मेलो रे...” अशी किंकाळी देत देवाजी जागीच कोसळले. फोनच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या मुलीने हा हृदयद्रावक प्रसंग ऐकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

पत्नीला मिळणाऱ्या वागणुकीचा राग

आरोपी योगेश हा आई-वडिलांसोबत राहत होता. त्याची पत्नी गर्भवती असूनही वडील तिला कामाला लावत आणि सतत त्रास देत असल्याचा त्याला राग होता. याच कारणातून त्याने पित्याचा खून करण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी तो आधीच भट्टीवरून निघून बोगद्याजवळ दबा धरून बसला होता.

खून करून ‘शोध’ नाटक

हत्या केल्यानंतर योगेशने घरी जाऊन रक्ताने माखलेली कुन्हाड धुऊन टाकली. त्यानंतर आई व नातेवाईकांसोबत वडिलांचा शोध घेण्याचे नाटक केले. काही वेळाने बोगद्याजवळ देवाजी यांचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांचा तपास, आरोपीची कबुली

घटनेची माहिती मिळताच गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान योगेशच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. कठोर चौकशीनंतर त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.

परिसरात हळहळ

धकाते कुटुंबात पाच मुलींनंतर योगेशचा जन्म झाला होता. या घटनेमुळे पालोरा व ताडूरवारनगर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026