जनसंघर्ष अर्बन निधीतील मुख्य आरोपी प्रणीत मोरे यांचा जामीन फेटाळला !  

बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीतील ४९ कोटींच्या अपहाराचा मास्टरमाइंड प्रणीत देवानंद मोरे याचा जामीन अर्ज १६ एप्रिल रोजी दारव्हा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजीवकुमार नरखेडे यांनी नामंजूर केला.

जनसंघर्ष अर्बन निधीतील मुख्य आरोपी प्रणीत मोरे यांचा जामीन फेटाळला !  

Financial Fraud

अखेर नायरा पेट्रोल पंप व्यवहारातील एक कोटी ४० लाखांचा झाला भरणा!

मानोरा (Financial Fraud) : बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीतील ४९ कोटींच्या अपहाराचा मास्टरमाइंड प्रणीत देवानंद मोरे याचा जामीन अर्ज १६ एप्रिल रोजी दारव्हा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजीवकुमार नरखेडे यांनी नामंजूर केला. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार पेट्रोल पंप व्यवहारातील एक कोटी ४० लाखांचा भरणा पूसद सक्षम प्राधिकाऱ्यांकडे संबंधितांनी केला आहे. त्यामुळे ठेवीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जनसंघर्ष प्रकरणात वर्षभरापासून दारव्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुख्य आरोपी प्रणीत मोरे यांनी जामीन अर्ज सादर केल्यानंतर न्यायालयात सुनावणी झाली. अंतिम युक्तिवादानंतर गुरुवारी जामिनावर निकाल देण्यात आला. ठेवीदार व शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील ॲड अंकुश देशमुख यांनी युक्तिवाद केला. तसेच दिग्रस येथील नायरा पेट्रोल पंप संचालकाला प्रणीत मोरे यांच्याशी झालेल्या व्यवहारातील शिल्लक असलेल्या रकमेचा भरणा १५ एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकारी पूसद तथा सक्षम प्राधिकारी आशिष बिजवल यांच्याकडे करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.  रकमेचा भरणा न केल्यास पेट्रोल पंप सीलबंद करण्याचा आदेश पारित केला होता. त्यामुळे संबंधितांनी बुधवारी १६ एप्रिल रोजी १ कोटी ४० लाखांच्या रकमेचा भरणा पूसद एसडीओ कार्यालयात केला. जनसंघर्षमध्ये ६ हजार २०० खातेदारांच्या ४९ कोटी ६९ लाखांच्या ठेवी अडकून आहेत. एसआयटीने काही चल, अचल संपत्ती जप्त केली आहे. वाहनही ताब्यात घेतले आहे. मात्र, शासन अधिसूचना अद्यापही जारी झाली नसल्याने लिलाव प्रक्रिया रखडली आहे. आमची ठेवी रक्कम कधी मिळणार? याकडे मानोरा देवीदारांचे लक्ष लागले आहे.

फॉरेन्सिक ऑडिट, लेखी जबाब ठरला महत्त्वाचा !

मास्टर माईंड प्रणीत मोरे यांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयात अनेक सुनावण्या झाल्या. यावेळी न्यायालयात फॉरेन्सिक ऑडिट आणि पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी रोबिन बन्सल यांचा लेखी जबाब सादर केला होता. त्यामुळे आरोपीचा जामीन नामंजूर होण्यासाठी या दोन्ही बाबी महत्त्वपूर्ण ठरल्या.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026