FDA Maharashtra

महाराष्ट्रात FDA ची धडक कारवाई; १२.१० लाखांचा गुटखा-तंबाखू जप्त, १४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDA ने महाराष्ट्रात भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात धडक मोहीम राबवली. नागपुरात १२.१० लाखांचा गुटखा-तंबाखू जप्त करत ३ जणांना अटक करण्यात आली.

महाराष्ट्रात FDA ची धडक कारवाई; १२.१० लाखांचा गुटखा-तंबाखू जप्त, १४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

FDA Maharashtra

सणासुदीच्या काळात भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात राज्यभर मोहीम; नागपूर विभागात ३ जणांना अटक, दोन वाहने ताब्यात

मुंबई : सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील भेसळ, बनावट खाद्यपदार्थ आणि अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संपूर्ण महाराष्ट्रात विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत नागपूर विभागातून तब्बल १२.१० लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या मालाच्या वाहतुकीसाठी वापरलेली दोन वाहने ताब्यात घेण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्याच्या विविध भागांत केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच अस्वच्छता आढळलेल्या १४ हॉटेल्स व उपाहारगृहांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास किंवा संबंधित आस्थापनांविरोधात तक्रार असल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर अथवा FDA च्या तक्रार पोर्टलवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबईतही FDA ची कडक कारवाई

मुंबईतील काही प्रमुख आस्थापनांवरही अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने FDA ने कारवाई केली. ग्राहकाच्या तक्रारीनंतर कुलाब्यातील ऐतिहासिक **‘ऑलिंपिया कॉफी हाऊस’**चा परवाना निलंबित करण्यात आला. तपासणीदरम्यान अन्न साठवणुकीच्या जागेजवळ मूत्रालय असल्याचे आढळले. तसेच झुरळे आणि माश्यांचा प्रादुर्भाव, मांसाचे डाग तसेच अस्वच्छ पाण्याचा वापर यांसारख्या त्रुटीही निदर्शनास आल्या.

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने कॅन्टीनचा परवानाही निलंबित करण्यात आला.

याशिवाय चेंबूर येथील ‘ब्लिंकिट’ (Blink Commerce Pvt Ltd), घाटकोपरमधील ‘विश्वास स्वीट्स’ आणि ‘A-1 ड्रायफ्रूट्स’, वरळीतील ‘मिलान पंजाब’ तसेच मलाडमधील ‘सद्गुरु स्वीट्स’ यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

खवा, मावा आणि मिठाईवर विशेष लक्ष

सणांच्या पार्श्वभूमीवर दुग्धजन्य पदार्थ आणि बनावट खव्याची विक्री रोखण्यासाठी ठाणे, पालघर, पुणे आणि कोल्हापूर परिसरात विशेष तपासणी करण्यात आली. या कारवाईत एकूण ७.३८ लाख रुपये किमतीचा २,८१३ किलो खवा, मावा आणि मिठाईचा साठा जप्त करण्यात आला.

ठाण्यातील काशिमीरा पोलीस ठाण्यासमोर दोन स्वतंत्र वाहनांमधून अस्वच्छ आणि संशयास्पद परिस्थितीत वाहतूक केला जाणारा ५.८६ लाख रुपयांचा खवा व स्वीट मावा जप्त करण्यात आला. याशिवाय पालघरमधील चारोटी टोल नाका, सातारा जिल्ह्यातील कराड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथेही अस्वच्छ परिस्थितीत तयार केलेले दुग्धजन्य पदार्थ ताब्यात घेण्यात आले.

२७ हॉटेल्सची तपासणी; १४ परवाने निलंबित

FDA च्या या मोहिमेत राज्यभरातील २७ हॉटेल्स आणि उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळलेल्या १४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर सुधारणा करण्यासाठी १३ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे १.९२ लाख रुपयांची संशयास्पद मिठाई जप्त करण्यात आली. तसेच अहिल्यानगर आणि नाशिक रोड येथे संशयास्पद गूळ व तूप ताब्यात घेण्यात आले आहे.

सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी FDA ची ही कारवाई सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026
‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

संजय राऊतांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र लिहून अधिकाऱ्यांकडून कथित वसुली आणि ‘क्लोजिंग नोटिस’ प्रकरणांची स्वतंत्र चौकशी मागितली.

Sep 28, 2026
मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा परवाना निलंबित; फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग, झुरळ-मुंग्यांचा वावर

मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा परवाना निलंबित; फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग, झुरळ-मुंग्यांचा वावर

मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा FDAने परवाना निलंबित केला. तपासणीत बर्फावर रक्ताचे डाग, झुरळे, मुंग्या आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळल्या.

Sep 23, 2026