उभ्या टँकरला दुचाकीची धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

आंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला दुचाकीची जोरदार धडक लागल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

उभ्या टँकरला दुचाकीची धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Fatal Crash

महारकुंड (खापा) येथे भीषण अपघात

सावनेर (Fatal Crash) : आंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला दुचाकीची जोरदार धडक लागल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना मंगळवार, दि. ५ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७:३० वाजताच्या सुमारास खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महारकुंड येथे घडली.

श्रावण झिंगू परतेकी (४५) व कांता श्रावण परतेकी (३५), रा. सवरनी, ता. सौसर, जि. छिंदवाडा असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण परतेकी हे आपल्या पत्नी कांता परतेकी यांना दुचाकी (क्र. एमपी २८ एमपी ०१८३) वर बसवून सावनेर येथे कथा आटपून खापा मार्गे सवरनी गावाकडे परत जात होते. दरम्यान, खापा-महारकुंड मार्गावर रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या, लाईट व रिफ्लेक्टर नसलेल्या आणि क्रमांक नसलेल्या हिरव्या रंगाच्या ट्रॅक्टर-टँकरला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समाजसेवक हितेश बंसोड यांना मिळताच त्यांनी तत्काळ खापा पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही सावनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सावनेर येथील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आले असून खापा पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यावर वाहने उभी करताना योग्य सुरक्षितता, संकेतचिन्हे व प्रकाशयोजना यांचे पालन न केल्यास किती मोठी जीवितहानी होऊ शकते, याचे हे दुःखद उदाहरण आहे. या अपघातामुळे कुटुंबातील कर्त्या दांपत्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित सामग्री

तीन वाहनांचा विचित्र अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

तीन वाहनांचा विचित्र अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर चोरंबा फाट्याजवळील पेट्रोल पंप परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.

Aug 24, 2026
एसटीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; दुसरा गंभीर

एसटीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; दुसरा गंभीर

ST Bus Accidental death: सटी बसने दिलेल्या धडकेत फाळेगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना मालेगाव येथील तामसी फाट्यावरील उड्डाणपुलावर घडली.

Aug 20, 2026
हातावरील मेहंदीही न सुकता संपलं आयुष्य; जळगावात भरधाव कारच्या धडकेत वैशाली पाटील ठार

हातावरील मेहंदीही न सुकता संपलं आयुष्य; जळगावात भरधाव कारच्या धडकेत वैशाली पाटील ठार

लग्नाच्या आनंदाला अवघे सहा दिवस उलटले असतानाच एका भीषण अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

Jul 14, 2026
दोन दूचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

दोन दूचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

Bike Accidental Death: अपघातात एक दूचाकी चालक पडून डोक्यात जबर मार घेतला, त्याच ठिकाणी मृत होईपर्यंत. दुसरा कासकर हा गंभीर जखमीत झाला.

Jul 12, 2026
फादर्स डेच्या दिवशी दुर्दैवी अंत! भरधाव वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू

फादर्स डेच्या दिवशी दुर्दैवी अंत! भरधाव वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू

वेगाने धावणाऱ्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर बाप-लेकी दोघेही वाहनाच्या चाकाखाली सापडले.

Jun 21, 2026