रिसोड तालुक्यातील मांडवा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

तालुक्यातील मांडवा येथील अल्पभूधारक शेतकरी रोहीदास वामन जाधव (वय 65) यांनी आज सकाळी राहत्या घरातील टिनपत्राखालील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

रिसोड तालुक्यातील मांडवा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Farmer Suicide

रिसोड (Farmer Suicide) : तालुक्यातील मांडवा येथील अल्पभूधारक शेतकरी रोहीदास वामन जाधव (वय 65) यांनी आज सकाळी राहत्या घरातील टिनपत्राखालील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळाचा पुढील तपास रिसोड पोलिस करीत आहेत.

मांडवा येथील रोहीदास वामन जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करीत होते. आत्महत्याग्रस्त जाधव यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

सदर घटना सोमवार, दि. 18 मे रोजी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या दरम्यान कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. यानंतर घटनेची माहिती रिसोड पोलिस स्टेशनला देण्यात आली. ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक राजेंद्र वानखेडे व जमादार ज्ञानेश्वर बेले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, रिसोड येथे हलविण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखेडे व जमादार ज्ञानेश्वर बेले करीत आहेत. आत्महत्याग्रस्ताच्या डोक्यावर काही कर्ज असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026