Family Death

जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; दोन मुलींसह आई-वडिलांनी रेल्वेसमोर जीव दिल्याची घटना

अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली.

जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; दोन मुलींसह आई-वडिलांनी रेल्वेसमोर जीव दिल्याची घटना

Family Death

अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा येथील धक्कादायक प्रकार; आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू

जळगाव : अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली. सुनील अमृत भिल आणि त्यांच्या पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्या दोन मुलींसह रेल्वेसमोर उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत चौघांचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. भिल कुटुंबाने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून उपलब्ध माहितीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू आहे.

घटनेशी संबंधित परिस्थिती आणि आत्महत्येमागील संभाव्य कारणांचा अमळनेर पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तपासातूनच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026