Entertainment News

'सई टिकेल की नाही, शंका होती'; सुबोध भावेंचा मोठा खुलासा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

'सई टिकेल की नाही, शंका होती'; सुबोध भावेंचा मोठा खुलासा

Entertainment News

'बोल बोल राणी'च्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सईच्या सुरुवातीच्या प्रवासापासून आजच्या यशस्वी कारकिर्दीपर्यंत सुबोध भावेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही ठसा उमटवणाऱ्या सईच्या प्रवासाबाबत अभिनेता सुबोध भावे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मनमोकळेपणाने भाष्य केले. सईच्या सुरुवातीच्या काळात तिच्याबाबत काही शंका वाटत होती, मात्र 'दुनियादारी'नंतर तिच्यात मोठा सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.

सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर यांचा 'बोल बोल राणी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिघांनी 'कलाकृती मीडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी सईच्या करिअरमधील बदलांवर बोलताना सुबोध भावे यांनी तिच्या अभिनयातील प्रगल्भतेचे विशेष कौतुक केले.

सुबोध भावे म्हणाले की, सई जेव्हा सांगलीहून मुंबईत अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आली होती, तेव्हा ती अगदी नवखी होती. त्या काळात त्यांनी एकत्र दोन-तीन प्रोजेक्ट्सवर काम केले होते. त्यापैकी एका चित्रपटाची केवळ गाणी चित्रित झाली आणि तो प्रकल्प बंद पडला. तसेच 'सनई चौघडे' या चित्रपटातही दोघांनी एकत्र काम केले होते.

चिन्मय मांडलेकरबाबत सुरुवातीपासूनच तो उत्कृष्ट अभिनेता असल्याची खात्री होती, कारण 'वादळवाट' मालिकेत त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव होता, असेही सुबोध यांनी सांगितले. मात्र सईबाबत त्यावेळी ती इंडस्ट्रीत किती काळ टिकेल, याविषयी मनात साशंकता होती. तिचा अभिनय चांगला असला तरी त्या काळात तिचा आवश्यक तितका फोकस जाणवत नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना सुबोध भावे यांनी सांगितले की, 'दुनियादारी' चित्रपटानंतर सईच्या व्यक्तिमत्त्वात आणि काम करण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला. त्या चित्रपटानंतर ती अधिक केंद्रित, जाणीवपूर्वक आणि सूज्ञपणे भूमिका निवडू लागली. याचा अर्थ यापूर्वी ती वाईट काम करत होती असा नाही, तर आता ती अधिक विचारपूर्वक आणि परिपक्वतेने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या योगदानाचाही उल्लेख करत सुबोध भावे म्हणाले की, ज्या पद्धतीने रंजना, जयश्री गडकर आणि अलका कुबल यांनी त्यांच्या काळावर अधिराज्य गाजवले, त्याचप्रमाणे पुढील काही वर्षांनी या काळाचा उल्लेख झाला, तर मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर यांनी हा काळ गाजवला, असे निश्चितपणे म्हटले जाईल.

संबंधित सामग्री

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या घरी आनंदाची बातमी; गणेश चतुर्थीला मुलाचा जन्म

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या घरी आनंदाची बातमी; गणेश चतुर्थीला मुलाचा जन्म

जुबिन नौटियाल बाबा झाला! १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी मुलाचा जन्म झाला. आई आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती जुबिनने दिली.

Sep 29, 2026
महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमवर शोककळा; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन

महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमवर शोककळा; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले. सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दुःख व्यक्त केले.

Sep 17, 2026
ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्यावर सहा तासांची स्पाइन सर्जरी;  रुग्णालयातून शेअर केला हेल्थ अपडेट

ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्यावर सहा तासांची स्पाइन सर्जरी; रुग्णालयातून शेअर केला हेल्थ अपडेट

ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्या पाठीच्या कण्यावर सहा तासांची शस्त्रक्रिया झाली. उपचारानंतर त्यांनी रुग्णालयातील आणि घरी परततानाचे फोटो शेअर करत हेल्थ अपडेट दिले.

Sep 12, 2026
‘मिर्झापूर’चा बॉक्स ऑफिसवर भौकाल!

‘मिर्झापूर’चा बॉक्स ऑफिसवर भौकाल!

Mirzapur Movie ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात अंदाजे 24.75 कोटी

Sep 06, 2026
 'हनुमान अंश'ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला: २ किटी बजेटमध्ये १०० किटी कमाई!

'हनुमान अंश'ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला: २ किटी बजेटमध्ये १०० किटी कमाई!

नेम करोली बाबा बधनावर आधारित 'हनुमान अंश'ने २ किटी बजेटमध्ये १०० किटीपेक्षा जास्त कमाई केली. दिग्दर्शक विशाल चतुर्वेदीने चित्रपटासाठी कोणतीही महत्त्वारी पगारी घेतली नाही.

Sep 06, 2026