मुंबई (Mirzapur Movie) : मिर्झापूर’ या लोक ‘प्रिय वेब सीरिजची क्रेझ आता मोठ्या पडद्यावरही पाहायला मिळत आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि रवि किशन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने 2026 मधील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत टॉप-5 मध्ये स्थान मिळवले आहे.
पहिल्या दिवशी किती कमाई?
4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात अंदाजे 24.75 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केल्याचे वृत्त आहे. (Mirzapur Movie) यामध्ये हिंदी आवृत्तीचा वाटा सुमारे 24.60 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तर तेलुगू डब आवृत्तीने जवळपास 15 लाख रुपयांची कमाई केली.
चित्रपटाचे भारतातील ग्रॉस कलेक्शन सुमारे 29.70 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ट्रेड ट्रॅकर Sacnilkच्या अपडेटेड आकडेवारीनुसार पहिल्या दिवसाची कमाई 25 कोटींच्या पुढे गेल्याचे दिसते. Mirzapur Movie त्यामुळे बॉक्स ऑफिसचे आकडे पुढील अपडेटमध्ये बदलू शकतात.
2026 मधील टॉप ओपनर्समध्ये ‘मिर्झापूर’
पहिल्याच दिवशी केलेल्या दमदार कमाईमुळे (Mirzapur Movie) ‘मिर्झापूर: द मूव्ही’ने 2026 मधील मोठ्या हिंदी ओपनर्समध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार हा चित्रपट वर्षातील चौथ्या क्रमांकाचा मोठा हिंदी ओपनर ठरला आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’, ‘टॉक्सिक’ आणि ‘बॉर्डर 2’ या चित्रपटांनंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा नंबर लागतो. Mirzapur Movie त्यामुळे आगामी शनिवार-रविवारच्या सुट्टीत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
OTT नंतर आता मोठ्या पडद्यावर ‘मिर्झापूर’चा जलवा
‘मिर्झापूर’च्या (Mirzapur Movie) वेब सीरिजला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच विश्वाला सिनेमाच्या माध्यमातून पुढे नेण्यात आले आहे. गुरमीत सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल आणि रवि किशन यांच्यासह फ्रँचायझीशी संबंधित अनेक लोकप्रिय कलाकार दिसत आहेत.
वेब सीरिजमुळे आधीच तयार झालेला मोठा चाहतावर्ग हा चित्रपटासाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. (Mirzapur Movie) पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर आता विकेंडमध्ये ‘मिर्झापूर: द मूव्ही’ किती कोटींचा गल्ला जमवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.