दाताळा विद्युत केंद्र अभियंता यांना कार्यालयात कोंडले

दाताळा विद्युत केंद्रात अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यापासून संध्यकाळी 6 ते 10 दरम्यान शेतातील वीज पुरवठा खंडित केला जातं होता.

दाताळा विद्युत केंद्र अभियंता यांना कार्यालयात कोंडले

Electricity Crisis

तात्काळ शेतकरी आंदोलनाची दखल; दाताळा विद्युत केंद्रात येणाऱ्या गावामध्ये शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत

मलकापूर (Electricity Crisis) : दाताळा विद्युत केंद्रात अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यापासून संध्यकाळी 6 ते 10 दरम्यान शेतातील वीज पुरवठा खंडित केला जातं होता. त्यामुळे शेतातील गुरे लहान मुले यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. परीक्षेची वेळ असल्यामुळे विध्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत होते. म्हणून ग्रामीण भागात शेतातील सिंगल फेज वीज पुरवठा हा चोवीस तास निरंतर सुरु ठेवावा या करिता बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संभाजी शिर्के यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता तायडे यांना निवेदन देण्यात आले होते.

या निवेदनावर कोणत्याही प्रकारची सकारात्मक कार्यवाही न झाल्यामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी दाताळा विद्युत केंद्र अभियंता यांच्या कॅबिनला कुलूप लावत जोपर्यंत आपण आमच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेणार नाही तो पर्यंत कुलूप उघडणार नाही अश्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेत बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांचे सह शेतकरी संतोष राजपूत, दिपक राजपूत भैया तायडे सुनील वानखडे योगेंद्र राजपूत सुरज राजपूत यांचे सोबतच उपस्थित शेतकऱ्यांनी अभियंता श्रीधनकर यांना कुलूप लावून आत कोंडून घेतले. थोड्या वेळात आजपासून वीज पुरवठा खंडित न कारण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन कर्त्यांनी त्यांची कुलूप उघडून सुटका केली. या आंदोलनाची दखल घेत भागातील वीज पुरवठा खंडित न करता सुरळीत सुरु करण्यात आला आहे.

ज्या प्रमाणे देशात व्यापारी, कारखानदार, तसेच शहरी भागातील लोकांना जशी चोवीस तास वीज दिली जाते तसेच अधिकार माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आहे. म्हणून या नंतर शेतकऱ्यांना विनाकारण त्रास द्याल तर यापेक्षा आणखी आक्रमक आंदोलन शेतकऱ्यांसाठी उभे केलं जाईल - संभाजी शिर्के, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस बुलढाणा

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026