परभणी जिल्हा बँकेच्या मतदार यादीतील दोन प्रतिनिधी अपात्र; एक प्रकरण उच्च न्यायालयात, आज सुनावणी

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी आणि नाथरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधी निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परभणी जिल्हा बँकेच्या मतदार यादीतील दोन प्रतिनिधी अपात्र; एक प्रकरण उच्च न्यायालयात, आज सुनावणी

Election Controversy

पाथरी व नाथरा विविध कार्यकारी सेवा संस्थांतील प्रतिनिधींची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्याचे आदेश

परभणी (Election Controversy) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी आणि नाथरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधी निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरम अपूर्ण असताना प्रतिनिधी निवडीचे ठराव मंजूर करण्यात आल्याच्या हरकती मान्य करत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पाथरी संस्थेच्या प्रतिनिधीबाबतच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची सुनावणी सोमवार, १ जून रोजी होणार आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादीवरील हरकतींवर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांनी गुरुवार, २८ मे रोजी दोन महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार पाथरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून जुनेद खान अब्दुल्ला खान दुर्रानी यांचे नाव अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. संस्थेच्या बैठकीत कोरम अपूर्ण असताना प्रतिनिधी निवडीचा ठराव घेण्यात आल्याचा आक्षेप मेहराज खान शेरगुल खान यांनी घेतला होता. तो मान्य करत हा आदेश देण्यात आला.

तसेच नाथरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रतिनिधी मिनाक्षी कर्णकुमार वाकणकर यांचे नावही अंतिम मतदार यादीतून वगळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणातही कोरम अपूर्ण असताना प्रतिनिधी निवडीचा ठराव मंजूर करण्यात आल्याचा आक्षेप चेअरमन गणेश कातारे यांनी घेतल्यानंतर तो मान्य करण्यात आला.

दरम्यान, पाथरी संस्थेच्या प्रतिनिधीबाबत दिलेल्या आदेशाविरोधात याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सुनावणी सोमवार, १ जून रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंचा महामोर्चा; 4 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंचा महामोर्चा; 4 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा 4 ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा; निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राजकीय वाद वाढला.

Sep 26, 2026
गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्यास सोसायटी कारवाई करू शकते का? जाणून घ्या कायदा

गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्यास सोसायटी कारवाई करू शकते का? जाणून घ्या कायदा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते.

Aug 26, 2026
सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये कायदेशीर पेच

सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये कायदेशीर पेच

केंद्रीय बँकिंग नियमन अधिनियम (BR Act) आणि महाराष्ट्र राज्य सहकार कायदा यांमधील विसंगतीमुळे राज्यातील सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये मोठा कायदेशीर गोंधळ उडाला आहे.

Aug 26, 2026
हाऊसिंग सोसायट्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मेंटेनन्सवरील व्याजदरात मोठी कपात, नवे नियम लागू

हाऊसिंग सोसायट्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मेंटेनन्सवरील व्याजदरात मोठी कपात, नवे नियम लागू

राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मेंटेनन्स शुल्क आणि उशिराने भरल्या जाणाऱ्या देयकांवरील व्याजदर यावरून वारंवार निर्माण होणारे वाद लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत.

Aug 04, 2026
निवडणुकीआधीच गोकुळमध्ये ‘चौकशी’चा स्फोट

निवडणुकीआधीच गोकुळमध्ये ‘चौकशी’चा स्फोट

राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड घडली आहे.

Apr 02, 2026