आखाडा बाळापूर (Bike Accidental Death) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते बोथी रस्त्यावर भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणारे बाप लेकास धडक दिली यात वडिलांचा गंभीर जख्मी होऊन मृत्यू झाला तर मुलगा जख्मी झाला याबाबत आज सदर दुचाकी चालकाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १० जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर ते बोथी रस्त्यावर आप्पा देववाडी येथे रामा अनंता वागतकर व त्यांचे वडील अनंता गंगाराम वागतकर(वय ६०वर्षे)हे दोघं रस्ता ओलांडत असताना दुचाकी एम एच २६ ए एक्स ७२५८च्या चालकाने त्याची दुचाकी भरधाव वेगाने हलगर्जीपणाने चालवून बापलेकास धडक दिली यात अनंता वागतकर हे गंभीर जख्मी होऊन त्यांचा मृत्यू झाला तर रामा वागतकर हे किरकोळ जख्मी झाले.याबाबत बुधवारी रामा वागतकर फिर्यादीवरून सदर दुचाकी चालकाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास बिट प्रमुख सिताराम मस्के हे करत आहेत.
रस्ता ओलांडताना बाप लेकास दुचाकीने उडवले, एकाचा मृत्यू
Bike Accidental Death: आखाडा बाळापूर तालुक्यातील बोथी रस्त्यावर एक दुचाकीच्या चालकाने रस्ता ओलांडणारे दोन परिवार सदस्य बापला लेकास धडक दिला.
Bike Accidental Death
संबंधित सामग्री
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार
Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू
ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम
आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज
मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.