शिक्षक भरती

शिक्षक भरतीची कागदपत्र तपासणी सुरू

Teacher Recruitment: शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली

शिक्षक भरतीची कागदपत्र तपासणी सुरू

Teacher Recruitment

 

१६०० उमेदवारांची कागदपत्रे तपासणीसाठी प्रक्रिया ५ सप्टेंबरपर्यंत

हिंगोली ( Teacher Recruitment) : शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्र पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी निर्धारित ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गाच्या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून एक हजार ६०० पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयांमार्फत ही प्रक्रिया ५ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार असल्याचेही बनसोड यांनी सांगितले. पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील शासकीय आश्रम शाळांमधील शिक्षकांच्या एकूण  दोन हजार ४२१ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे तपासण्यात येत आहेत.

प्राप्त उमेदवारांच्या यादीत (Teacher Recruitment) प्राथमिक शिक्षकांचे ९२७, माध्यमिक शिक्षकांचे ४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचे २५२ उमेदवार आहेत. त्यापैकी पेसा क्षेत्रातील ४५९, तर नॉन-पेसा क्षेत्रातील एक हजार १४१ उमेदवारांचा समावेश आहे. नाशिक विभागात सर्वाधिक ५८८ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होत आहे. ठाणे विभागात ४२४, नागपूर विभागात २९६ आणि अमरावती विभागात २९२ उमेदवारांचा समावेश आहे. कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

तसेच जाहिरातीनुसार आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रत्येक कागदपत्राची स्वसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे. निर्धारित दिनांक, वेळ आणि ठिकाणी उपस्थित न राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. पात्र उमेदवारांची सविस्तर यादी आणि कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही आदिवासी विकास विभागाने कळवले आहे.

टैग्स: Teacher Recruitment

संबंधित सामग्री

जिल्ह्यातील  जिल्हा परिषद कांत्राटी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा; शिक्षक सेनेची मागणी

जिल्ह्यातील  जिल्हा परिषद कांत्राटी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा; शिक्षक सेनेची मागणी

ZP Contract Teacher: शिवसेना शिंदे गट गटाच्या सचिव व प्रवक्ता तसेच विदर्भ विभागीय संपर्क मंत्री मनीषा ताई कायंदे विधानपरिषद आमदार यांचा नुकताच गडचिरोली येथे दौरा आयोजित

Aug 12, 2026
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी 30 हजार 209 रिक्त पदांची जाहिरात

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी 30 हजार 209 रिक्त पदांची जाहिरात

Pavitra Portal Teacher Recruitment: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती प्रक्रिया राबव

Aug 07, 2026
विद्यार्थ्यांची गळती रोखणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य: शिक्षणमंत्री दादाजी भुसे

विद्यार्थ्यांची गळती रोखणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य: शिक्षणमंत्री दादाजी भुसे

School Education Department: महाराष्ट्र शासनाने शाळा पटसंख्या आणि गुणवत्तेला सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजनांना सुरुवात केली आहे. शिक्षकांची भरती, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुधारणा

Jul 09, 2026
परभणीतील ग्रामीण शिक्षणाच्या हक्कासाठी आ.डॉ.गुट्टेंनी उठवला आवाज !

परभणीतील ग्रामीण शिक्षणाच्या हक्कासाठी आ.डॉ.गुट्टेंनी उठवला आवाज !

गंगाखेड मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठी असूनही इयत्ता आठवीचे वर्ग सुरू करण्यात आलेले नाहीत.

Jun 30, 2026
जिल्ह्याला मिळणार 65 गुणवंत केंद्रप्रमुख; शैक्षणिक व्यवस्थेला नवे बळ

जिल्ह्याला मिळणार 65 गुणवंत केंद्रप्रमुख; शैक्षणिक व्यवस्थेला नवे बळ

बुलढाणा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाला बळ देण्यासाठी लवकरच 65 गुणवंत व उच्चशिक्षित केंद्रप्रमुखांची नियुक्ती होणार आहे.<br/>

Jun 16, 2026