DJ Noise

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना भरचौकात मारहाण

गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना पुण्यातील गजबजलेल्या टिळक रोडवर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना भरचौकात मारहाण

टिळक रोडवर ऑन कॅमेरा मारहाण; ‘गणेशोत्सवाबद्दल चुकीचं बोलत होता, मारायलाच पाहिजे होतं’ म्हणत कार्यकर्त्याने समर्थन केल्याचा दावा

पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना पुण्यातील गजबजलेल्या टिळक रोडवर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमादरम्यान डीजेच्या आवाजाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना स्थानिक गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला.

प्राथमिक माहितीनुसार, विद्यानंद बापट हे टिळक रोड परिसरात गणेशोत्सवाच्या काळातील डीजे आणि मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत नागरिकांशी संवाद साधत होते. यावेळी एका स्थानिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी भरचौकात बापट यांना मारहाण केली. या घटनेचे चित्रीकरण कॅमेऱ्यात झाल्याची माहिती आहे.


गणेशोत्सवातील डीजेच्या दणदणाटाविरोधात सातत्याने भूमिका घेत असल्यामुळेच विद्यानंद बापट हे काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर टिळक रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात मारहाण करणाऱ्या एका कार्यकर्त्याची भूमिका समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.  संबंधित कार्यकर्त्याने बापट यांच्या भूमिकेचे समर्थन न करता उलट मारहाणीचे समर्थन केल्याचे सांगण्यात आले. गणेशोत्सवाबाबत ते चुकीचे बोलत असल्याने त्यांना मारायला पाहिजे होते, अशी भूमिका त्याने मांडली.

यापुढे बोलताना संबंधित कार्यकर्त्याने पुण्यात केवळ गणेशोत्सव आहे का, असा सवाल करत गणेशोत्सवाच्या विरोधात बोलणाऱ्याला अशाच प्रकारे कानशिलात मारून धडा शिकवण्याची भाषा केल्याचेही समोर आले आहे.

या घटनेमुळे पुण्यात गणेशोत्सवातील डीजे, ध्वनीप्रदूषण आणि त्याविरोधात भूमिका घेणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026