जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून शाळा व उपकेंद्राची पाहणी

Collector Rahul Gupta: जिल्ह्यातील विकासकामे तसेच नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळा

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून शाळा व उपकेंद्राची पाहणी

Collector Rahul Gupta

 

परतीच्या मार्गावर वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्ह्यातील विकासकामे तसेच नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इमारत बांधकामाची, सेनगाव तालुक्यातील सवना येथील आयुष्मान उपकेंद्राची पाहणी केली. पाहणी दौऱ्यावरून परतताना इंचा गावाजवळ चोरजवळा-पळशी मार्गावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर त्यांच्या निदर्शनास आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सदरील ट्रॅक्टर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.

काम दर्जेदार करा
गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सुरू असलेल्या नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाची पाहणी केली. बांधकामाची सद्यस्थिती, कामाचा दर्जा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. बांधकामाचे काम दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

आयुष्मान उपकेंद्राला भेट
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी सेनगाव तालुक्यातील सवना येथील आयुष्मान उपकेंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. उपकेंद्रामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, उपलब्ध औषधसाठा, मनुष्यबळ तसेच दैनंदिन कामकाजाची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

एक ट्रॅक्टर जप्त
पाहणी दौरा आटोपून परतत असताना इंचा गावाजवळ चोरजवळा-पळशी मार्गावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना आला. त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार ट्रॅक्टर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

टैग्स: Collector Rahul Gupta

संबंधित सामग्री

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावाने आणि फोटोचा वापर करून काही अज्ञातांनी सोशल मीडियावर बनावट (फेक) फेसबुक प्रोफाइल तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Sep 22, 2026
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य

Sep 15, 2026
हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

Collector Rahul Gupta: जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीक

Sep 15, 2026
पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

Collector Rahul Gupta: पोळा व कर हा सणानिमित्त हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी भरणाऱ्या बैलांच्या मोठ्या यात्रेमुळे वसमत ते नागेशवाडी दरम्यानचा रहदारीचा रस्ता दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश

Sep 08, 2026