'त्या' दिव्यांग युवकाला मदतीची अपेक्षा

तो दिव्यांग... वय असेल २२ ते २४ वर्षे... बोलताही येत नाही अन् लिहिताही येत नाही... दिव्यांग असल्याने त्याला चालताही येत नाही...

'त्या' दिव्यांग युवकाला मदतीची अपेक्षा

Disabled Rights

शहरातील रस्त्यावर मागतोय भीक

दिलीप रामटेके

नागपूर (Disabled Rights) : तो दिव्यांग... वय असेल २२ ते २४ वर्षे... बोलताही येत नाही अन् लिहिताही येत नाही... दिव्यांग असल्याने त्याला चालताही येत नाही... कायमस्वरूपी रोजगार नसल्याने तो रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करतोय. तो इशारा करूनच सांगतोय, मला भीक नको, शासनाकडून रोजगार मिळवून द्या...!

वर्तमानात समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींना योग्य सुविधा, संधी आणि आधार देण्यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जातात. ज्यांना शारीरिक, मानसिक किंवा इतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये अडचणी येतात. दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास तो विद्यापीठ ग्रंथालय मार्गावर वाहनचालकांना भीक मागताना दिसून आला. त्याच्याजवळ एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये क्युआर कोडची कॉपी होती. कोणी त्याला जी पे करून पैसे देत होते, तर कोणी रोख स्वरूपात पाच अथवा दहा रुपये देत होते. त्याची स्त्यिा' दिव्यांग युवकाला मदतीची अपेक्षाथती पाहून वाहनचालक स्वतः थांबून त्याला मदत करीत होते. त्याला बोलता येत नसल्यामुळे तो आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हता. हाताने इशारे करून तो आपल्या मनातील आपल्या भावना सांगण्याचा प्रयत्न करीत होता.

यावेळी देशोन्नतीने त्याला बोलते केले असता आपली व्यथा हाताच्या इशाऱ्याने मांडली. मला भीक नको, माझ्या कुवतीनुसार मला सरकारकडून रोजगार मागून द्या, अशी आर्त हाक इशाऱ्यातून देत होता.

सायंकाळ झाली की तो कुठे जातो, कोणासोबत राहतो. त्याला आई-वडील, बहीण-भाऊ आहेत का, याची माहिती मिळाली नाही. गेल्या दोन ते तीन दिवसापासून येथील रस्त्याने फिरत आहे एवढीच माहिती मिळाली. शहरातील अनेक भागात, मुख्य चौकावर तो भीक मागत असल्याचेही कळले. दिव्यांगांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असताना त्याचा लाभ त्याला का मिळू नये, हा प्रश्न मात्र मनाला भेडसावून गेला. त्याला लिहिता, बोलता, वाचता येत नाही म्हणून संधी मिळत नसावी का, असा प्रश्न उपस्थित झाला.

दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात

दिव्यांग व्यक्तींना कुणीही त्याच्या क्षमतेनुसार कार्य करण्याची संधी देत नाही. परिणामी त्यांना उदरनिर्वासाठी भीक मागावी लागते. अशी वेळ दिव्यांग व्यक्तीवर येऊ नये, यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अशा दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या कुवतीनुसार व क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा, ज्यामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकेल!

संबंधित सामग्री

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंबिका नगर येथे बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त महाआरती, नंदी बैल पूजा, गोपालकाला आणि बक्षीस वितरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 10, 2026
नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपूर शहरात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे.

Sep 03, 2026
‘आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही’; नितीन गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

‘आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही’; नितीन गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Aug 25, 2026
नागपुरात क्लोरीन गॅसची गळती; 52 जण रुग्णालयात, 200 मीटर परिसर सील

नागपुरात क्लोरीन गॅसची गळती; 52 जण रुग्णालयात, 200 मीटर परिसर सील

नागपूरच्या गोधणी परिसरात मध्यरात्री क्लोरीन गॅसची गळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Aug 24, 2026
नागपुरातील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने ई-मेल, पोलिसांचा कसून तपास

नागपुरातील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने ई-मेल, पोलिसांचा कसून तपास

नागपूर शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शहरातील तब्बल 15 शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

Aug 18, 2026