टंचाईच्या काळात डिझेलचा काळाबाजार?

भारत पेट्रोलियम कंपनीने कठोर कारवाई करत सात दिवसांसाठी डिझेल पुरवठा बंद केला आहे.

टंचाईच्या काळात डिझेलचा काळाबाजार?

Diesel Black Marketing

उदगीरमधील एका पेट्रोल पंपाचा डिझेल पुरवठा ७ दिवसांसाठी बंद

उदगीर (Diesel Black Marketing) : इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या काळात ग्राहकांना डिझेल नाकारून टँकरद्वारे गावोगावी किरकोळ विक्री केल्याचा आरोप असलेल्या उदगीर येथील बी.आर. मुक्कावार पेट्रोल पंपावर भारत पेट्रोलियम कंपनीने कठोर कारवाई करत सात दिवसांसाठी डिझेल पुरवठा बंद केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील पेट्रोल पंप चालकांमध्ये खळबळ उडाली असून वाहनधारक व शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून उदगीर शहर व परिसरात पेट्रोल-डिझेलसाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत बी.आर. मुक्कावार पेट्रोल पंपावर ग्राहकांची गर्दी असतानाही नियमित ग्राहकांना डिझेल न देता मोठ्या प्रमाणात डिझेल एका खासगी टँकरमध्ये भरून गावोगावी किरकोळ विक्रीसाठी नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर गावोगावी फिरून डिझेल विक्री न करण्याचे स्पष्ट निर्देश भारत पेट्रोलियम कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र, या निर्देशांकडे दुर्लक्ष करून डिझेलची विक्री करण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. संबंधित व्हिडिओ आणि तक्रारी कंपनीकडे पोहोचल्यानंतर चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर कंपनीने संबंधित पेट्रोल पंपाचा डिझेल पुरवठा सात दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

या टंचाईच्या काळात लातूर जिल्ह्यात अशा प्रकारची झालेली ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे इतर पेट्रोल पंप चालकांनाही याचा इशारा मिळाला असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, दिवसभर शेतीची कामे करून रात्री उशिरापर्यंत डिझेलसाठी रांगेत उभे राहणाऱ्या शेतकऱ्यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. "ग्राहकांना डिझेल मिळत नसताना हजारो लिटर डिझेल नेमके कुठे आणि कोणाला विकले गेले?" असा सवालही शेतकरी व वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

इंधन वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी पेट्रोल कंपन्या आणि प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनधिकृत विक्रीविरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहिल्यास इंधनाचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांचे म्हणणे

"बी.आर. मुक्कावार पेट्रोल पंपावर गावोगावी डिझेल वाटपासाठी टँकर भरत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. संबंधित व्हिडिओ कंपनीकडे पाठविण्यात आल्यानंतर कंपनीने या पंपाचा डिझेल पुरवठा सात दिवसांसाठी बंद केला आहे."
– राम बोरगावकर, तहसीलदार, उदगीर

"या पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगाच रांगा असतानाही गावोगावी डिझेल विक्री केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कंपनीने संबंधित पेट्रोल पंपावर कारवाई केली आहे."
– सुमित्रा एलामल्ले, नायब तहसीलदार (पुरवठा), उदगीर

संबंधित सामग्री

“ई-कार्डचा बिघाड अन् वृद्धांवर संतापाचा उद्रेक; एसटी वाहकाच्या शिवीगाळीचा आरोप!”

“ई-कार्डचा बिघाड अन् वृद्धांवर संतापाचा उद्रेक; एसटी वाहकाच्या शिवीगाळीचा आरोप!”

Udgir ST E-Card: ई-कार्ड मशीन बंद असल्याच्या कारणावरून उदगीर-अहमदपूर एसटी बसमध्ये प्रवासी आणि वाहकात झालेला वाद चांगलाच पेटल्याचा आरोप आहे. या वादात वाहकाने प्रवाशांना तसेच त्यांच्या आई-बहिणींविषयी

Oct 05, 2026
उदगीरच्या दूध डेअरीला ‘हिरवा कंदील’; दुसऱ्या धवलक्रांतीचा मार्ग मोकळा!

उदगीरच्या दूध डेअरीला ‘हिरवा कंदील’; दुसऱ्या धवलक्रांतीचा मार्ग मोकळा!

Udgir's milk dairy: वर्षानुवर्षे बंद असलेल्या उदगीरच्या शासकीय दूध डेअरीच्या पुनरुज्जीवनाला अखेर महत्त्वाचे वळण मिळाले आहे. उदगीर येथील शासकीय दूध डेअरीच्या अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल

Oct 05, 2026
अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

Udgir Illegal Money Lending: उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना अवैध सावकारी व्यवहाराच्या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने सोमवारी (५ ऑक्टोबर) मोठी कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026