धानोरा अन्नत्याग आंदोलन

धानोरा (बु.) येथे युवकांचा अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ

Dhanora Hunger Strike: मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत धानोरा बु. येथील ग्राम पंचायत कार्यालयासमोर विशेष ग्रामसभा घेण्यात यावी यासह ग्रामपंचायतमधील विविध विकासकाम

धानोरा (बु.) येथे युवकांचा अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ

Dhanora Hunger Strike

मानोरा (Dhanora Hunger Strike) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत धानोरा बु. येथील ग्राम पंचायत कार्यालयासमोर दि. १५ सप्टेंबर पासून विशेष ग्रामसभा घेण्यात यावी यासह ग्रामपंचायतमधील विविध विकासकामाची चौकशी संदर्भात सूरज म्हातारमारे यांच्यासह इतरांनी दि. १५ सप्टेंबरपासून अन्नत्याग उपोषण आंदोलनाला प्रारंभ केली आहे. 

 या (Dhanora Hunger Strike) पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच अश्विनी भरत वानखडे यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देऊन  विशेष ग्रामसभा घेण्याचे लेखी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती, परंतु त्यांच्या लेखी पत्राला झुगारून विशेष ग्रामसभा घ्यावी यासह ग्रामपंचायत मधील विविध विकास कामाच्या कारभाराच्या चौकशी संदर्भात युवकांनी ग्राम पंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. न्याय मिळेपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार गावातील युवकांनी व्यक्त केले आहे. 

मानवी व ग्रामहिताच्या दृष्टीने आपण आपले उपोषण मागे घ्यावे

दरम्यान, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बहिष्कारामुळे ग्रामसभेच्या कामकाजावर परिणाम होत असला तरी (Dhanora Hunger Strike) ग्रामस्थांच्या हितासाठी विशेष ग्रामसभा घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात लेखी विनंती निवेदन देऊनही आंदोलननाला सुरुवात केली आहे. अशी माहिती विचारले असता सरपंच सौ. अश्विनी वानखडे यांनी दिली.

टैग्स: Dhanora Hunger Strike

संबंधित सामग्री

धानोरा (बु.) येथील उपोषण मागे घ्या, विशेष ग्रामसभा घेण्याचे आंदोलकांना पत्र

धानोरा (बु.) येथील उपोषण मागे घ्या, विशेष ग्रामसभा घेण्याचे आंदोलकांना पत्र

Dhanora Hunger strike: मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत धानोरा बु. येथे विविध विषयांवर चर्चा करून नियमानुसार योग्य कार्यवाही करण्याची आणि तातडीने विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची मागणी

Sep 14, 2026