आखाडा बाळापूर (Devjana Shiwar sugarcane) : प्रतिनिधी कळमनुरी तालुक्यातील मौजे देवजना येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश पुंजाजी कल्याणकर यांचा एक एकर ऊस गुरुवारी दुपारी अचानक आग लागून जळून खाक झाला. वेळीच शेतकरी ग्रामस्थांनी व अग्निशामक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली यामुळे मोठा अनर्थ नुकसान टळले. देवजना येथील शेतकरी रमेश कल्याणकर यांचा एक एकर ऊस 17 रोजी 2026 विजेच्या शॉट सर्कीटमुळे अचानक आग लागली ऊस जळुन खाक झाला आहे तरी बाजुला असलेल्या शेतकऱ्यांचा ऊसाकडे आग जात होती मात्र गावातील अनेक शेतकरी नागरिकांनी घेतलेल्या मेहनती मुळे पुढील अनर्थ टळला.
यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी रामराव कल्याणकर यांनी व परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभय पाटील सावंत यांनी आमदार संतोष बांगर व कळमनुरी नगरपालिका अध्यक्ष प्रतिनिधी आर.आर.पाटील यांना फोनद्वारे संपर्क साधून अग्निशमन दलाची गाडी पाठवा हि विनंती केली लगेच पुलीस प्रशासन व अग्निशमन शमन दलाची गाडी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर ताबडतोब आली.
त्यामुळे देवजना येथील शेतकऱ्यांचे बरेच होनारे नुकसान वाचले पेटलेला ऊस विझविण्यासाठी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष शिवरामजी कल्याणकर, प्रदीप कल्याणकर, कैलासराव कल्याणकर,सुनिल वाघमारे अरविंद चोपडे ,चंचळ कल्याणकर, बालाजी माधवराव, हरिदास कल्याणकर, राजेश कल्याणकर,भागवत कल्याणकर,माणिकराव देशमुख,रूस्तुमराव कल्याणकर सह अनेक शेतकरी व गावातील तरुणांनी आग विझवण्यासाठी धावपळ केली अस रामराव कल्याणकर यांनी सांगितले. बिट प्रमुख गजानन राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी होमगार्ड व पोलीस पथकासह धाव घेतली व आग विझवण्यासाठी पावले उचलली.
अचानक लागलेल्या (Devjana Shiwar sugarcane) आगीत अल्पभूधारक शेतकरी रमेश पुंजाजी कल्याणकर यांचा ऊस जळून अतोनात नुकसान झाले आहे.सदर शेतकऱ्यास आर्थिक संकटांतून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने मदत देण्याची गरज आहे.