श्री शिवाजी शिक्षण संस्था

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा गुणवत्तापूर्ण विकास: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Shivaji Education Institution: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हर्षवर्धन देशमुख आणि दिलीप इंगोले यांची नेतृत्वाची भूमिका प्रशंसा केली. अमृत महोत्सवी सत्कारमूर्तीपदासाठी त्यांचा सत्कार

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा गुणवत्तापूर्ण विकास: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nitin Gadkari

 

हर्षवर्धन देशमुख व दिलीप इंगोले यांचा अमृत महोत्सवी सत्कार

अमरावती (Shivaji Education Institution) : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारावर श्री शिवाजी शिक्षण संस्था कार्यरत आहे. हर्षवर्धन देशमुख (Harshvardhan Deshmukh) व दिलीप इंगोले यांनी या संस्थेचा गुणवत्तापूर्ण विकास केला. या दोघांचा राजकीय प्रामाणिकपणा दाद देण्यासारखा आहे. आयुष्यात संवेदनशीलता अत्यंत आवश्यक असून त्यांनी ती जपली. जशी जनता तसे नेते अशी स्थिती राजकारणाची आहे. स्मार्ट शहर नाही गावे झाली पाहिजे. तोच संदेश देण्यासाठी नागपूरला भाऊसाहेबांच्या नावाने कृषी कॅनव्हेक्शन सेंटर तयार केले आहे. शेतकऱ्यांचे दुःख कमी व्हावे, यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

शिव परिवाराच्या वतीने श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे (Shivaji Education Institution) अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख (Harshvardhan Deshmukh) व कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरन्यायाधीश भूषण गवई तसेच प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य किरणताई महल्ले, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महापौर श्रीचंद तेजवानी, खा. बळवंत वानखडे, आ. प्रताप अडसड, आ. सुलभा खोडके, आ. राजेश वानखडे, आ. संजय खोडके, आ. रवी राणा, आ. प्रवीण तायडे, आ. किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.

माजी न्या. भूषण गवई म्हणाले, हर्षवर्धन देशमुख व दिलीप इंगोले यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. ते सदैव तरुणांसाठी प्रेरणादायी राहील. शिवाजी शिक्षण संस्थेला केंद्र व राज्य सरकारने कोणताही भेदभाव न करता भरभरून सहकार्य केले. तत्पूर्वी (Shivaji Education Institution) अमृत महोत्सवी सत्कारमूर्ती हर्षवर्धन देशमुख, त्यांच्या पत्नी निर्मला आणि दिलीप इंगोले यांचा भावपूर्ण सत्कार मान्यवारांच्याहस्ते झाला. सत्कारमूर्तीवर साकारलेल्या नेतृत्वदीप व समर्पित या दोन विशेषांकाचे प्रकाशन झाले व कार्यकर्तृत्वावरची चित्रफित दाखविण्यात आली. त्यांनी सत्काराला सविस्तर उत्तर दिले. प्रास्ताविक हेमंत काळमेघ, संचालन डॉ. स्मिता देशमुख, डॉ. राजेश मिरगे यांनी केले. आभार ऍड. गजानन पुंडकर यांनी मानले. कार्यकमाला संस्थेचे आजीवन सभासद, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

Congress candidate Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांची आढावा बैठक

Sep 29, 2026
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

Amravati Teachers Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली..

Sep 29, 2026
१००% इथेनॉलवर धावणार टोयोटाची इनोव्हा; ऑक्टोबरमध्ये लॉन्च, गडकरींचा मोठा दावा

१००% इथेनॉलवर धावणार टोयोटाची इनोव्हा; ऑक्टोबरमध्ये लॉन्च, गडकरींचा मोठा दावा

ऑक्टोबरमध्ये १००% इथेनॉलवर चालणारी टोयोटा इनोव्हा लॉन्च होणार असल्याची गडकरींची घोषणा. पेट्रोलची गरज नाही, खर्च ₹२५ प्रतिलिटरइतका असल्याचा दावा.

Sep 27, 2026
महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज, २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी.

Sep 22, 2026
नागपूर शहरातील सर्वात लांब आणि महागडा उड्डाणपूल; ९९८ कोटींच्या इंदोरा–दिघोरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे आज लोकार्पण

नागपूर शहरातील सर्वात लांब आणि महागडा उड्डाणपूल; ९९८ कोटींच्या इंदोरा–दिघोरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे आज लोकार्पण

नागपूरचा ८.९ किमीचा इंदोरा-दिघोरी उड्डाणपूल आज खुला होत आहे. ९९८ कोटींच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा.

Sep 19, 2026