अकोला शहरात भीषण आग; रामदासपेठमधील ‘सिटी हॉस्पिटल’ला अचानक आग

शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या रामदासपेठ परिसरातील ‘सिटी हॉस्पिटल’ला आज अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

अकोला शहरात भीषण आग; रामदासपेठमधील ‘सिटी हॉस्पिटल’ला अचानक आग

City Hospital

रुग्णांना बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न; शहरात खळबळ

अकोला (City Hospital) : अकोला शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या रामदासपेठ परिसरातील ‘सिटी हॉस्पिटल’ला आज अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आग लागल्यावेळी रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेणारे अनेक रुग्ण दाखल होते.

घटनेनंतर रुग्णालय प्रशासन, सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नागरिकांकडून रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले. विशेषतः अतिदक्षता विभाग (ICU) आणि जनरल वॉर्डमध्ये असलेल्या गंभीर रुग्णांना प्रथम सुरक्षित स्थळी हलवण्यावर भर देण्यात आला.

आगीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. रामदासपेठ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की अन्य कारण आहे, याचा तपास सुरू आहे. घटनेची तीव्रता पाहता प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026