गोदावरी नदीपात्रात बुडून १२ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

पालम तालुक्यातील मौजे फळा परिसरातील गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (११ जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

गोदावरी नदीपात्रात बुडून १२ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Child Drowned

देवदर्शनासाठी आलेल्या मुलाचा पाय घसरला; पालम पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

परभणी (Child Drowned) : पालम तालुक्यातील मौजे फळा परिसरातील गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (११ जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साई कैलास पवार (वय १२, रा. रायवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) हा आपल्या कुटुंबीयांसह मौजे फळा येथे देवदर्शनासाठी आला होता. गुरुवारी सायंकाळी तो गोदावरी नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी उतरला. मात्र त्याला पोहता येत नसल्याने आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरला व तो खोल पाण्यात गेला.

घटनेनंतर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तोपर्यंत त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती वडील कैलास पवार यांनी पालम पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कांगणे आणि पोलीस हवालदार विलास बळवंते करीत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे रायवाडी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, नदी, तलाव, धरणे आणि इतर जलाशयांमध्ये अंघोळ किंवा पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026