Chikhli, Hunger Strike

आ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने मंगरूळ नवघरे येथील उपोषण मागे

मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षकांबाबत गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले आमरण उपोषण आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकारामुळे अखेर मागे घेण्यात आले

आ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने मंगरूळ नवघरे येथील उपोषण मागे

Chikhli, Hunger Strike

गावकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद; प्रशासनाकडून तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन

चिखली : मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षकांबाबत गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले आमरण उपोषण आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकारामुळे अखेर मागे घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आमदार श्वेता महाले यांनी प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची माहिती मिळताच आमदार श्वेता महाले पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित कोणतीही समस्या दुर्लक्षित केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यानंतर त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुलाबराव खरात यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित पाच शिक्षकांचा प्रस्ताव तातडीने तयार करून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याच्या सूचना केल्या. तसेच शाळेच्या गरजेनुसार नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव त्वरित तयार करण्याबाबत शिक्षणाधिकारी श्री. विकास पाटील यांनाही निर्देश दिले.

यावेळी आमदार श्वेता महाले यांनी सांगितले की, मंगरूळ नवघरे गावातील ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे वळविण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून त्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असेल, तर प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या वतीने त्यांचे वडील श्री. अंकुशराव पाटील यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले.

यावेळी भास्करराव मोरे, कुणाल गायकवाड, एकनाथराव जाधव, संतोष वाकडे, श्री. जैन व श्री. प्रवीण वायाळ यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रहिवासी तालुक्यातील बँकांमधूनच पीक कर्ज द्या: आ. श्वेताताई महाले

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रहिवासी तालुक्यातील बँकांमधूनच पीक कर्ज द्या: आ. श्वेताताई महाले

MLA Shwetatai Mahale: तालुक्यातील बँकांमार्फतच त्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली....

Oct 06, 2026