कोलारा फाट्यावर भीषण अपघात; देऊळगाव धनगर येथील तरुण जागीच ठार

चिखली-मेहकर मार्गावरील कोलारा फाटा येथे शनिवारी (दि. १८ एप्रिल) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला.

कोलारा फाट्यावर भीषण अपघात; देऊळगाव धनगर येथील तरुण जागीच ठार

Chikhli Accident

चिखली (Chikhli Accident) : चिखली-मेहकर मार्गावरील कोलारा फाटा येथे शनिवारी (दि. १८ एप्रिल) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात देऊळगाव धनगर येथील एका ४० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत व्यक्तीचे नाव विनोद एकनाथ चेके (वय ४०, रा. देऊळगाव धनगर) असे असून, ते मोटारसायकलने चिखलीहून मेहकरकडे जात होते. त्यांच्या मोटारसायकलचा क्रमांक एमएच २८ बीपी ०५९२ असा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद चेके हे भरधाव वेगाने मेहकरकडे जात असताना विरुद्ध दिशेने चिखलीकडे शेतमाल घेऊन येत असलेल्या बोलेरो पिकअप (एमएच २८ बीबी ३५६१) वाहनाशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की बोलेरो पिकअपच्या मागील चाकाचा टायर फुटला, तर मोटारसायकलस्वार विनोद चेके हे रस्त्याच्या कडेला असलेल्या जाळीत फेकले गेले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या दुर्दैवी अपघातामुळे देऊळगाव धनगर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026