चारठाणा घाणीचे साम्राज्य

चारठाणा येथे मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, नाल्या तुंबल्या

Charthana Dirty Road: चारठाणा गावात सफाई कर्मचारियों की हड़ताल के कारण मुख्य सड़कों पर कचरा और गंदगी का ढेर लग गया है, जिससे नागरिकों का जीवन कठिन हो गया है।

चारठाणा येथे मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, नाल्या तुंबल्या

Charthana Dirty Road

 

सफाई कामगारांचे पगार थकल्याने गावची सफाई ठप्प...?

परभणी/ चारठाणा (Charthana Dirty Road) : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे सुमारे 15 हजार लोकसंख्या असलेल्या चारठाणा गावात मुख्य रस्त्यावर सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतीकडे पुरेसे सफाई कामगार नसल्याने आणि असलेल्या कामगारांचे पगार थकल्याने मागील अनेक महिन्यांपासून गावातील स्वच्छता पूर्णपणे ठप्प झाली आहे.

100% नाल्या ब्लॉक होऊन संपूर्ण गावातील रस्त्यावरून घाण पाणी वाहत आहे परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावातील सर्वच नाल्या कचरा आणि गाळाने पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे उन्हाळा असूनही घरांमधील सांडपाणी (Charthana Dirty Road) आणि घाण पाणी जागोजागी मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. नाल्या तुंबल्याने हे पाणीही रस्त्यावरच साचत आहे. परिणामी मुख्य रस्ता पूर्ण खराब झाला असून चिखल आणि घाणीने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील अनेक वार्डांमध्ये मागील दोन वर्षांपासून एकही सफाई कामगार फिरकलेला नाही. पगार न झाल्याने कामगार कामावर येत नाहीत. त्यामुळे नाल्यांची सफाई, रस्त्यांची झाडलोट पूर्णपणे बंद आहे.

आणी त्यासाठी नागरिकच जबाबदार आसुन रस्त्यावरच  कचरा टाकल्यामुळे सदर प्रश्न उद्भवत आहे.  एकीकडे ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा, तर दुसरीकडे काही नागरिकांकडूनही बेजबाबदारपणा दिसून येत आहे. घरातील कचरा आणि झाडलेला केर थेट मुख्य रस्त्यावरच टाकला जात आहे. या (Charthana Dirty Road) कचऱ्यावर डुकरे जमा होऊन अधिक घाण पसरवत आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.गावकऱ्यांनी तातडीने सफाई कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश्न सोडवून नालेसफाई आणि रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पाईपलाईनच्या गळत्या बंद करून नागरिकांनीही रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी जनजागृती व दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने देखील त्वरित लक्ष न दिल्यास आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे.

संबंधित सामग्री

नाशिक शहरात वाढला स्वाइन फ्लूचा धोका; तिघांचा करुण अंत, 43 रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिक शहरात वाढला स्वाइन फ्लूचा धोका; तिघांचा करुण अंत, 43 रुग्ण पॉझिटिव्ह

Nashik Swine Flu: मुसळधार पावसानंतर शहरात डेंग्यू आणि साथीच्या आजारांबरोबरच स्वाईन फ्लूचे संकटही उभे ठाकले आहे. शहरासह लगतच्या ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असून, आतापर्यंत ४३ रुग्ण

Aug 11, 2026
संजीवनी नगर परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

संजीवनी नगर परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

Kanhan Development Forum: कांद्री नगरपंचायत संजीवनी नगर परिसरात विविध समस्या निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका ऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन गाढवे आणि नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांना निवेदन

Jul 12, 2026
राधे नगरातील सांडपाणी व बंद नाल्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडे तक्रार

राधे नगरातील सांडपाणी व बंद नाल्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडे तक्रार

Shirla Gram Panchayat Wastewater: पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील बंजारा नगर व गहीलोत लेआउट लगत असलेल्या राधे नगर परिसरात साचलेल्या दूषित सांडपाण्यामुळे व बंद पडलेल्या नाल्यांमुळे..

Jun 28, 2026
हिंगोली शहर घाणीच्या विळख्यात; जागोजागी कचऱ्याचे ढीग, नगर परिषद प्रशासन सुस्त

हिंगोली शहर घाणीच्या विळख्यात; जागोजागी कचऱ्याचे ढीग, नगर परिषद प्रशासन सुस्त

Hingoli Filth Area: हिंगोली शहरात कचऱ्याच्या ढीगामुळे स्वच्छता व संक्रामिक आजारांमधील जोरदार संबंध पाहून गाभीर धोका नागरिकांना मिळाला. जिल्हाधिकारींचा उपस्थिती मागणी

Jun 19, 2026
हिंगोलीत तळणाच्या तेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अन्न-औषध प्रशासन आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

हिंगोलीत तळणाच्या तेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अन्न-औषध प्रशासन आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

Hingoli Oil Violation Action: हिंगोलीत हॉटेल, ढाबे आणि इतर व्यावसायिकांमध्ये तळण्याच्या तेलाचा पुनरापेक्ष सतत वापर करून फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Jun 11, 2026