जिल्हा परिषद शाळा बंद

चाकुर येथील जि.प. शाळा बंद; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Zilla Parishad schools: मानोरा तालुक्यातील चाकुर येथील जि.प. शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. पालकांनी शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

चाकुर येथील जि.प. शाळा बंद; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Zilla Parishad schools

 

पालकांची शाळा सुरू करण्याची मागणी

मानोरा (Zilla Parishad schools) : मानोरा तालुक्यातील चाकुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा बंद असल्याने मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा व आर्थिक भाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चाकुर येथील शाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी, असे निवेदन गट शिक्षणाधिकारी अनिल पवार यांना दि. ५ मे रोजी शेकडो ग्रामस्थ व पालकांनी दिले आहे.

दिलेल्या विनंती अर्जात पालकांनी म्हटले आहे की, चाकुर येथील जि.प. शाळा बंद (Zilla Parishad schools) असण्यामागे शिक्षकांची अनुपलब्धता व इतर काही प्रशासकीय अडचणी ही मुख्य कारणे आहेत. या शाळेत प्रामुख्याने गरीब आणि गरजू कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागत आहे, जे त्यांच्या सुरक्षिततेच्या आणि आर्थिक दृष्टिने गैरसोयीचे आहे.  आमच्या मुलांचे शैक्षणिक भविष्य विचारात घेऊन, या प्रकरणात वैयक्तिक लक्ष द्यावे आणि चाकुर येथील जि.प. शाळा लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश द्यावेत. शाळेसाठी आवश्यक असणारे शिक्षक आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. 

आम्ही ग्रामस्थ शाळेच्या दुरुस्तीसाठी आणि इतर कामांसाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही पालकांनी नमूद केले आहे. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन शाळा तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा सर्व गावकरी पालकांनी व्यक्त केली आहे. निवेदनावर शेकडो ग्रामस्थ व पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026