Car Accident

विदगाव येथे कार थेट तापी नदीच्या पात्रात; तीन ते चार जण किरकोळ जखमी

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट तापी नदीच्या पात्रात कोसळल्याची भीषण घटना विदगाव, ता. चोपडा येथे घडली.

विदगाव येथे कार थेट तापी नदीच्या पात्रात; तीन ते चार जण किरकोळ जखमी

Car Accident

पुलावरील सुरक्षा भिंतीचा प्रश्न ऐरणीवर; बांधकाम विभागाबाबत वाहनधारकांसह नागरिकांमध्ये संताप

जळगाव : जळगावकडून चोपड्याकडे जात असताना मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट तापी नदीच्या पात्रात कोसळल्याची भीषण घटना विदगाव, ता. चोपडा येथे घडली. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून, कारमधील तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व प्रवासी हे चोपडा येथील रहिवासी असल्याचे समजते.

चोपडा येथील रहिवासी कारने जळगाववरून चोपड्याकडे जात असताना विदगाव येथील तापी नदीच्या पुलाजवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावरून थेट नदीच्या पात्रात खाली कोसळली. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने कारमधील तीन ते चार प्रवाशांना केवळ किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सकाळी दहा वाजेच्या सुमारास कार तापी नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यासाठी क्रेन मशीन मागवण्यात आली होती. यावेळी कार बाहेर काढण्याच्या कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वारंवार अपघात, तरीही सुरक्षा भिंत नाही

ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्याच विदगाव तापी नदीच्या पात्रात काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे कार अपघात झाला होता. त्या अपघातात एका महिलेचा व बालकाचा मृत्यू झाला होता. वारंवार अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तापी नदीच्या बाजूला कोणतीही संरक्षण भिंत किंवा लोखंडी पत्रे बसवण्यात आलेले नाहीत.

प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून केली जात आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026