बुलढाणा महसूल अधिकारी

महसूल दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी होणार गौरव

Buldhana Revenue Officer: महसूल व वन विभागाच्या वतीने दरवर्षी १ ऑगस्ट रोजी 'महसूल दिन' साजरा केला जातो. या औचित्याने महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी

महसूल दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी होणार गौरव

Buldhana Revenue Officer

 

​उपविभागीय अधिकारी शरद पाटील व तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह ११ जणांची जिल्हास्तरावर निवड

​चिखली (Buldhana Revenue Officer) : महसूल व वन विभागाच्या वतीने दरवर्षी १ ऑगस्ट रोजी 'महसूल दिन' साजरा केला जातो. या औचित्याने महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात येतो. सन २०२५-२६ या वर्षासाठी बुलढाणा जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निवड करण्यात आली आहे.

​या निवडीमध्ये (Buldhana Revenue Officer) बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी  शरद पाटील आणि देऊळगाव राजाच्या तहसीलदार श्रीमती वैशाली डोंगरजाळ यांनी बाजी मारली आहे. ​जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या अधिकृत पत्रानुसार, या सर्व गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल १५ ऑगस्ट २०२६ (स्वातंत्र्यदिन) रोजी सकाळी ठीक ८:१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे गौरव व सन्मान करण्यात येणार आहे.

​उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचारी यादी (२०२५-२६):
​शरद पाटील – उपविभागीय अधिकारी, बुलढाणा
​वैशाली डोंगरजाळ – तहसीलदार, देऊळगाव राजा
​डॉ. प्रवीणकुमार तुकाराम वराडे – नायब तहसीलदार, सिंदखेड राजा
​नंदकिशोर चौधरी – सहाय्यक महसूल अधिकारी, खामगाव
संजय सुपडू चौधरी – मंडळ अधिकारी, चिखली
विनोद मधुकर तोडे – महसूल सहायक, मेहकर
​अक्षय शंकर चौधरी – ग्राम महसूल अधिकारी, शेगाव
​सचिन ए. गिरी – शिपाई, मलकापूर
​कैलास देविदास चव्हाण – वाहन चालक, सिंदखेडराजा
​नारायण सुखदेव हिवाळे – पोलीस पाटील, चिखली
​पी. डी. वाघ – महसूल सेवक, संग्रामपूर

उपजिल्हाधिकारी (महसूल) समाधान गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मान्यतेने ही निवड यादी जाहीर करण्यात आली असून, सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय वर्तुळातून व नागरिकांमधून अभिनंदन केले जात आहे.  

संबंधित सामग्री

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’  गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’ गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

बुलढाण्यात संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील वाद पुन्हा पेटला. ‘बुलढाण्याचा बिहार’ टीकेला गायकवाडांनी चिखलीतील आरोपांसह प्रत्युत्तर दिले.

Sep 30, 2026
शेतकरी जगला तरच देश जगणार; बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

शेतकरी जगला तरच देश जगणार; बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

Buldhana Shiv Sena Akrosh: यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने..

Sep 29, 2026
मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

बुलढाण्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; ‘ट्रिगर-१’ लागू. आमदार चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश.

Sep 26, 2026
कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026