BJ Medical College

पुण्यात धक्कादायक घटना; बी. जे. मेडिकल कॉलेजचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी १४ दिवसांपासून बेपत्ता, रॅगिंगचा आरोप

पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील एक विद्यार्थी गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यात धक्कादायक घटना; बी. जे. मेडिकल कॉलेजचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी १४ दिवसांपासून बेपत्ता, रॅगिंगचा आरोप

BJ Medical College

कुटुंबीयांचा गंभीर आरोप; मानसिक छळाला कंटाळून वसतिगृह सोडल्याचा दावा, खराडी पोलिसांकडे तक्रार

पुणे : पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील एक विद्यार्थी गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय अजयकुमार वंगे असे बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तन्मय हा बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो पुणे रेल्वे स्थानकावरून निघून गेला.

तन्मयने यापूर्वी आपल्या पालकांकडे महाविद्यालयातील काही स्थानिक विद्यार्थ्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. त्याच्यावर अपमानास्पद वागणूक, टोमणे मारणे आणि चिडवण्याचे प्रकार होत असल्याचे त्याने सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

तन्मयच्या पालकांनी उत्कर्ष सिंग, श्रेया यादव आणि त्यांच्या गटाकडून रॅगिंग होत असल्याचा आरोप केला आहे. या मानसिक छळाला कंटाळून तन्मयने महाविद्यालयाचे वसतिगृह सोडल्याची तक्रार त्यांनी पुणे पोलिसांकडे दिली आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित दोषी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

तन्मयचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. आपल्या मुलाला महाविद्यालयात रॅगिंगचा त्रास सहन करावा लागला आणि त्यातूनच तो कोणालाही न सांगता कॉलेज व वसतिगृह सोडून गेला, असा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, या प्रकरणाबाबत बी. जे. मेडिकल कॉलेजकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

संबंधित सामग्री

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026