बायोमेट्रिक हजेरी

भिक्षेकरी गृहांमध्ये बायोमेट्रिक हजेरी घ्या! 

Biometric Attendance: महिला व बालविकास आयुक्तांनी राज्य अन्न आयोगाच्या निर्देशानुसार सर्व भिक्षेकरी गृहांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सिस्टम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

भिक्षेकरी गृहांमध्ये बायोमेट्रिक हजेरी घ्या! 

Biometric Attendance

 

राज्य अन्न आयोगाच्या सूचनेवरून महिला व बालविकास आयुक्तांचे निर्देश!

लातूर (Biometric Attendance) : राज्य अन्न आयोगाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने भिक्षेकरीगृहांमधील प्रवेशितांचे बायोमेट्रिक उपस्थिती घेण्यासाठी आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व भिक्षेकरीगृहांमध्ये बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित करून प्रत्येक प्रवेशिताची बायोमेट्रिक उपस्थिती घेण्यात यावी. तसेच भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टिने संस्थांतर्गत कौशल्यविकास कार्यक्रम अनिवार्य करण्यात यावा, असे आदेश राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व उपाययोजना काढले आहेत. 

राज्य अन्न आयोगाकडे झालेल्या सुनावणीत राज्य अन्य आयोगाने राज्यात भीकमुक्ती व भूक मुक्तीसाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नात महिला व बालविकास विभागाने कोणतीही कसूर ठेवू नये, असे सांगत विविध उपाय योजनांचे आदेश दिले होते. त्यास अनुसरून राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने 8 मे रोजी याबाबतचे आदेश काढले आहेत.
भिक्षेकरांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी. (Biometric Attendance) जिल्हा नियोजन समितीकडे उपलब्ध असणाऱ्या 3 टक्के राखीव निधीचा वापर करुन भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी उपयुक्त असणारे, त्यांना सहज शिकता येणारे व त्यांना संस्थेतुन बाहेर पडल्यानंतर रोजगार उपलब्ध होईल, असे कौशल्यविकासाचे विविध कोर्सेस भिक्षेकरीगृहांमध्ये कार्यान्वित करण्यात यावेत, अशा सूचना या आदेशात कोकण, पुणे, नाशिक, नागपूर विभागीय उपायुक्तांना दिले आहेत.

अन्न आयोगाचे निर्णय...
राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष एडवोकेट महेश ढवळे आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी सुनावणी मध्ये दिलेले निर्णय व निर्देश पुढीलप्रमाणे होते.
1. पर्यायी प्रमाणीकरण बायोमेट्रिक अपयश झाल्यास पर्यायी पडताळणी सक्तीची करावी.
2. पुनर्वसन बळकटीकरण भिक मागणा-यांकरिता कौशल्यविकास कार्यक्रम अनिवार्य करावा. स्वयंरोजगार प्रशिक्षण, एनजीओ समन्वय प्रकोष्ठ, सेवाभावी संस्था यांचा सहभाग घेण्यात यावा. असे असताना पारंपारीक व्यवसाय करणा-यांना मात्र वगळण्यात यावे.

राज्यात 14 शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्र
महिला व बाल विकास विभागामार्फत एकूण 14 शासकीय भिक्षेकरी स्विकार केंद्र/भिक्षेकरी गृहे कार्यरत असून सदर भिक्षेकरीगृहांमध्ये मा. न्यायालयाच्या आदेशान्वये भिक्षेकरी दाखल होत असतात. सदर भिक्षेकरीगृहांमध्ये भिक्षेक-यांना दाखल केल्यानंतर त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सोयी-सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026