भिवापूर ग्रामपंचायत पोटनिवडणुक

भिवापूर तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर

Bhiwapur Gram Panchayat By-Election: भिवापूर तालुक्यामध्ये विविध ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत, ज्यात विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

भिवापूर तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर

Bhiwapur Gram Panchayat By-Election

भिवापूर (Bhiwapur Gram Panchayat By-Election) : तालुक्यातील अपात्रता मृत्यू व अन्यकारणाने रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकींचे दिनांक 29 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले. स्थानिक तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत नवेगाव (देशमुख) मध्ये अश्विनी बंडू गायकवाड , थुटानबोरी पुनर्वसन सुनील किसन लेकुरवाडे हे विजयी झाले. याशिवाय टाका ग्रामपंचायत मध्ये पंजाब महादेव पंचभाई, अड्याळ पुनर्वसन थेविता बाळू वरखडे आणि कवडसी बरड प्रफुल प्रलाद साठवणे हे तीन सरपंच अविरोध निवडून आले. तसेच कारगाव व पांजरे पार पुनर्वसन या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी कोणीही उमेदवारी अर्ज सादर न केल्याने सदर ग्रामपंचायतचे सरपंच पद रिक्त ठेवण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्य करता घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत कवडसी बरड ग्रामपंचायत मध्ये वैभव अर्जुन दडमल हे निवडणुकीत विजयी झाले. तर अड्याळ पुनर्वसन मध्ये गणेश बिसन खानकुरे पहामी ग्रामपंचायत मध्ये अनिल नथ्थू पिल्लेवान जवराबोडी ग्रामपंचायत मध्ये उषा महेंद्र बांते हे तीन ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भिवापूर तहसीलचे तहसीलदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात प्रमोद जांबुडे व सविन कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. एकूण 14 ग्रामपंचायत पैकी सात ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची व इतर ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्या करिता घेण्यात आलेल्या या पोट निवडणुकीत ग्रामीण मतदारांचा मात्र उत्साह दिसून आला नाही.

संबंधित सामग्री

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
मृत्यूची नोंद वेळेत करा! १ ऑक्टोबरपासून विलंब झाल्यास वाढणार सरकारी प्रक्रिया

मृत्यूची नोंद वेळेत करा! १ ऑक्टोबरपासून विलंब झाल्यास वाढणार सरकारी प्रक्रिया

१ ऑक्टोबरपासून मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल होणार असून, विलंब झाल्यास दंडाधिकाऱ्यांच्या आदेशासह अतिरिक्त कागदपत्रे आणि पडताळणी आवश्यक राहणार आहे.

Sep 29, 2026
तळप बु. येथील ग्रामपंचायत विकास कामात गैरव्यवहार!

तळप बु. येथील ग्रामपंचायत विकास कामात गैरव्यवहार!

Talap Gram Panchayat: मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तळप बु येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थानी

Sep 28, 2026
गुम्मी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ एकवटले

गुम्मी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ एकवटले

Gummi Gram Panchayat: गुम्मी ग्रामपंचायत कार्यालयात 25 ऑगस्ट रोजी सरपंच सौ. दिपाली नंदकिशोर हुडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचा आवश्यक कोरम पूर्ण

Sep 24, 2026
ग्रामपंचायत वापटामध्ये आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेचा आरोप

ग्रामपंचायत वापटामध्ये आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेचा आरोप

Gram Panchayat Financial Irregularity: तालुक्यातील गट ग्रामपंचायत वापटा, हट्टी मध्ये सन १ ऑक्टोबर २०२२ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील विविध विकास कामे, शासकीय निधीचा वापर, शासकीय योजना

Sep 21, 2026